
चिखलीकरांच्या मनात घोंगावतेय एकच भावना…
चिखली : शहरात महाविकास आघाडीच्या प्रचारादरम्यान एक भावना स्पष्टपणे उमटताना दिसत आहे,काशिनाथ आप्पा नगराध्यक्ष म्हणजे आपण सर्व नगराध्यक्ष! नागरिकांच्या मनात निर्माण झालेला हा विश्वास काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्या लोकाभिमुख कार्यशैलीचा प्रत्यय देणारा आहे. सामान्य माणसाच्या अडचणीला स्वतःची समस्या मानून धावून जाण्याची त्यांची वृत्ती, साधेपणा आणि सर्वांना जोडून घेण्याची ताकद यामुळे चिखलीकर त्यांना आपले नेतृत्व मानू लागले आहेत.
प्रचारसभांमध्ये, कॉर्नर मिटींगमध्ये आणि दैनंदिन संवादात लोक सहजपणे म्हणू लागले,आप्पा जिंकले म्हणजे आमच्यापैकीच एक नगराध्यक्षपदी बसतोय!शहरातील तरुण, महिला, वृद्ध, व्यावसायिक अशा सर्व स्तरांमधील नागरिकांमध्ये या भावनेला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे चिखलीत जनमानसाचा कल कोणत्या दिशेने आहे, हे स्पष्ट दिसू लागले आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात दररोज वाढत असलेली गर्दी, प्रभागनिहाय होत असलेला संवाद, अनेक अपक्षांचे जाहीर समर्थन आणि नागरिकांचा उत्साह पाहता चिखलीतील जनमत कोणत्या दिशेने आहे हे स्पष्टपणे जाणवते.शहरात जनता सांगते आहे की,यंदाची निवडणूक नाही… हे आमचे ध्येय आहे. आमचे नेतृत्व आहे. चिखलीचे भवितव्य घडवायचे असेल, तर नगराध्यक्षपदी काशिनाथ आप्पा बोंद्रे यांनाच निवडून दिले पाहिजे!



