छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
मधुकर साळुंके, पोपट धुपाजी भोसले व ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत यांनी घेतले श्री विठ्ठल-रुख्मिणीचे दर्शन
वैजापूर, दि. २५ :
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त वैजापूर शहरातील पाटील गल्ली येथील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात भक्तिमय वातावरणात पूजा-अर्चा करण्यात आली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत होती. विठ्ठल नामाच्या अखंड गजरात आणि भक्तिमय वातावरणात भाविकांनी श्री विठ्ठल-रुख्मिणीच्या चरणी नतमस्तक होत सुख, समृद्धी आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
यावेळी मधुकर साळुंके, पोपट धुपाजी भोसले तसेच ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत यांनी श्री विठ्ठल-रुख्मिणीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजा केली. त्यानंतर त्यांनी मंदिरात दर्शन घेऊन आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती व समृद्धी नांदो, अशी प्रार्थना केली.
मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. अनेक भाविकांनी विठ्ठल नामाचा गजर, भजन आणि हरिनामाच्या माध्यमातून आपली श्रद्धा व्यक्त केली. आषाढी एकादशीचा उत्साह आणि विठ्ठल भक्तीचा आनंद मंदिर परिसरात सर्वत्र अनुभवायला मिळत होता
पाटील गल्लीतील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात दर्शन घेताना मधुकर साळुंके, पोपट धुपाजी भोसले, ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत व इतर भाविक.






