उरण प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे,
उरण:
साई ट्रस्टचे अध्यक्ष नरसू पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयात आषाढी एकादशीचा सोहळा मोठया भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात शाळेच्या सुमारे अकराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी सलवार कुर्ता आणि विद्यार्थिनींनी नऊवारी साडी परिधान केले होती आणि हातात भगवे झेंडे घेतले होते. विठू नामाच्या गजरात टाऊनशिपमध्ये विद्यार्थ्यांच्या घोषणांनी सर्वांचेच लक्ष वेधले होते. संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.यावेळी जे एन पी ए चे अधिकारी वर्ग उपस्थित होते त्यामध्ये सयाजीराव साळुंखे मॅनेजर इस्टेट जे एन पी ए, प्रवीण पाटील लेबर वेल्फेअर ऑफिसर जे एन पी ए आणि संदीप घरत मॅनेजर जे एन पी ए यांनी सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे प्रशासकीय अधिकारी रमाकांत गावंड, माध्यमिक मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक गिरीश पाटील , बालोद्यान विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली बोरचटे, माध्यमिक इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक भूषण जाधव, आणि अंकुश जोगळे यांनी केले.सुरुवातीला शाळेचे आदर्श पिटी शिक्षक मनोहर टेमकर यांनी सर्व प्रमुख मान्यवरांचे महाराष्ट्राचे पारंपारिक नृत्य लेझीमच्या गजरात स्वागत केले. यानंतर रिंगण सोहळा संपन्न झाला. यावेळी शाळेचे संगीत शिक्षक पंडित गणेश बंडा यांनी आणि विद्यार्थ्यांनी भजन केले.दिंडी शिस्त आणि फलक लेखन कलाशिक्षक मिलिंद ठाकूर यांनी उत्तमप्रकारे केले.या रिंगण सोहळ्यात सर्व मान्यवरांनी सहभाग घेतला. जे एन पी ए चे उपस्थित सर्व अधिकारी विद्यार्थ्यासोबत नृत्याच्या भक्तीरसात दंग झाले. प्रमुख पाहुण्यांनी फुगडी देखील घातली.

यानंतर सर्व प्रमुख मान्यवरांनी श्री विठ्ठलाची मनोभावे पूजा केली. यावेळी साईट ट्रस्टचे अध्यक्ष नरसू पाटील सर यांनी सर्व मान्यवरांचे झाडाचे रोप देऊन स्वागत केले.






