Home / Uncategorized / सावळदबारा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती उत्साहात; वृक्षारोपण करून कार्याला अभिवादन…!

सावळदबारा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती उत्साहात; वृक्षारोपण करून कार्याला अभिवादन…!

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

छत्रपती शिवाजी विद्यालय व कै. लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील वरिष्ठ महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील जय कालिंका देवी शिक्षण प्रसारक संस्था संचलित छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावळदबारा तसेच कै. लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम प्रभारी प्राचार्य जीवन कोलते पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भाऊराव कोलते होते. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष भाऊराव कोलते पाटील यांच्या हस्ते करून अभिवादन केले. यावेळी संस्थेचे संचालक मंडळ, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जयंतीनिमित्त विद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी लावलेल्या वृक्षांचे संगोपन व संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन माजी प्राचार्य एन आर कोलते पाटील यांनी

प्रास्ताविकात प्राचार्य जीवन कोलते यांनी उपस्थितांचे स्वागत करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सार्वजनिक जीवनाचा आढावा घेतला. राज्याच्या विकासात, पायाभूत सुविधांच्या उभारणीत, आर्थिक शिस्त प्रस्थापित करण्यात तसेच प्रभावी प्रशासन उभारण्यात त्यांच्या योगदानाचा गौरव त्यांनी केला. विकासाभिमुख, निर्णयक्षम आणि शिस्तप्रिय नेतृत्व म्हणून अजित पवार यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयसिंह राजपूत व भास्कर खमाठ यांनी केले, तर विकास पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार