चिखली | मेघा जाधव
स्थानिक चिखली येथील श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयात डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२७ व्या जयंती उत्सोवातर्गत विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टीकोन निर्माण व्हावा या उद्देशाने दि.25 डिसेंबर 2025 रोजी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री.शंतनू पाटील सदस्य महाविद्यालयीन विकास समिती यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.पडोळे होते.तर परीक्षक म्हणून प्रा.डॉ.संगीता वळसे(ग्रहअर्थशास्त्र विभाग,संत भगवान बाबा कला महाविद्यालय सिंदखेड राजा) उपस्थित होत्या.तसेच आयक्यूएसी समन्वयक डॉ.व्ही.यु.पोच्छी,श्री आर.एस.भोंडे व श्री.ई.एल.जाधव,सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ.विजयश्री हेमके,क.म.पर्यवेक्षक प्रा. दिलीप उन्हाळे,यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.विद्यार्थ्यांनी आनंद मेळावासाठी विविध खाद्यपदार्थांचे एकूण 37 स्टॉल लावले होते.त्यासाठी सर्व विद्यार्थी शिक्षक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रतिभा चिखले यांनी आभार प्रदर्शन प्रा. गणेश थोरात यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समिती प्रमुख प्रा.दिलीप गावंडे तसेच सर्व आनंद मेळावा समितीने परिश्रम घेतले.






