वंदे मातृशक्ती महोत्सव आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या मातोश्री स्वर्गीय हीराबेन मोदीजी यांच्या पुण्यस्मरणा निमित मातृपुजन दिवस तथा आदर्श मातांचा सन्मान सोहळा
वारकरी संप्रदयासाठी अभिमानाचा क्षण
शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी
संत कृपा झाली । इमारत फळा आली । ज्ञानदेवे रचिला पाया । उभारिले देवालया । नामा तयाचा किंकर। तेणे रचिले ते आवार । जनार्धन एकनाथ। खांब दिधला भागवत । तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ॥ बहिणी म्हणे फडकती ध्वजा । निरुपना केले ओजा ॥

ह.भ.प पुरुषोत्तम महाराज पाटील
येथे उपकारासाठी l आले घर ज्या वैकुंठी l जगदोद्धारालागी धरिला अवतार l मिळविला बडीवार सिद्धाईचा l l
या श्री निळोबारायांच्या उक्तीप्रमाणे ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांचा जन्म नसून जगाच्या उद्धाराकरिता अवतार धरला हेच म्हणणे योग्य आहे .. वारकरी संप्रदायाचे भूषण असणारे आवाजाचे जादूगर म्हणून जर कोणाला ओळखत असतील तर ते म्हणजे हभप पुरुषोत्तम महाराज पाटील…

ह.भ.प. विशाल महाराजखोले
मुक्ताबाईने बोध खेचराशी केला l तेणे नाम याला उपदेशिले l नाम्याचे कुटुंब चांगला वटेश्वर l एका जनार्दनी विस्तार मुक्ताबाईचा l
ब्रहम चित्कला आदीशक्ती मुक्ताबाई यांच्या कृपा आर्शिवादाने नामदेव महाराजांनी जीवनभर भागवत धर्माची पतका खांदयावर वागवली कीर्तनाचे रंगी नाचत वारकरी संप्रदायाचे तेजस्वी, ज्ञानदीप जगी लावले. त्याप्रमाने ह.भ.प. विशाल महाराज खोले नामदेव रायांच्या रुपाने वारकरी संप्रदायाची पतका संपुर्ण विश्वाभर फडकवत आहेत . महाराजांच्या नावांमध्येच विशालता आहे भव्य दिव्य तेजस्वी प्रसिद्धी असे विशाल महाराजांचे कार्य आहे.

ह. भ.प सोपान महाराज सानप शास्त्री
आपला देह घालूनी पुढे l जे जे दृष्टी आतुडे l काया वाचा आणि चित्ते l सर्वाभुति भजली माते । त्यासी भगवत रूप सर्वभूते |सुनिश्चिते ठसावती।” भागवत धर्माचे अनुयायी, भक्त, वैष्णव अंशाचा
मेळावा जमवून त्या बहुजन समाजाचा आधार भागवत धर्मास देणे हेच एकनाथ महाराजाचे मुख्य कार्य होय. एक विशिष्ट हेतुने प्रेरित होऊन नाथानी भागवत धर्माची चळवळ चालविली. जनता जनार्दनाच्या पाठिंब्याशिवाय कोणताही धर्म, संप्रदाय, पंथ फोफावू शकत नाही. “नव्हे तो पाठिंबा म्हणजे संप्रदयाचा, धर्माचा, पंथाचा आत्माच आहे” हे तत्व संत एकनाथ महाराजांनी ओळखले. आणि नाथांनप्रमाण असाच अगळावेगळा ठसा संपूर्ण जगामध्ये माझ्या माहेरच वैभव असणारे ह. भ. प सोपान महाराज सानप शास्त्री यांनी उमटवला आहे. वारकरी संप्रदद्याचे मजबुत खांब म्हणजे सानप महाराज शास्त्री..
जिव्हाळा युट्युब चॅनल…
आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारनासी । ‘बोलिले जे ऋषी । साजभावे वरताया l
या तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे
वारकरी संप्रदयाचा प्रसार करणारे या तीन विभूतींना जोडले गेलेले प्रसार माध्याम म्हणजे (जिव्हाळा परिवार)
जिव्हाळा परिवारामुळे संपूर्ण जगभर वारकरी संप्रदयाचा प्रसार होत आहे
माझ्या या सर्व वैष्णव बांधवाचे खुप खुप अभिनंदन
धन्य माता पिता तयाचिया l

हभप सौ उर्मिलाताई कदम
ते सुख सांगता वाचे पडे मौन l जाणता ते धन्य गुरुभक्त l झालासे आनंद इंद्रियाचे द्वारी l बसले शेजारी चैतन्याचे l बहिणी म्हणे तसे झाले माझे मना l तुकाराम खुणा ओळखी त्या ll
🙏🙏 राम कृष्ण हरी🙏🙏






