Home / राजकारण / काशिनाथ आप्पा बोंद्रे यांनी साधला विविध व्यावसायिकांशी संवाद..!

काशिनाथ आप्पा बोंद्रे यांनी साधला विविध व्यावसायिकांशी संवाद..!

 

काशिनाथ आप्पाचं, आम्हाला न्याय देणार असल्याचा व्यापाऱ्यांचा विश्वास !

चिखली  :  महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे यांनी शहरातील डी.पी. रोड भागाचा दौरा करून तेथील दुकानदार, व्यापारीवर्ग, हातगाडीधारक, भाजीपाला व फळ विक्रेते यांच्याशी संवाद साधत त्यांच्या व्यवसायातील अडचणी, अपेक्षा आणि प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेतली. यावेळी व्यापारी वर्गाने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले.

संवादादरम्यान व्यापारीवर्गाने रस्त्यावरील अनियंत्रित रहदारी, पार्किंगची अपुरी व्यवस्था आणि परिसरातील स्वच्छता या काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले. या समस्या व्यवसायावर थेट परिणाम करत असल्याचे त्यांनी सांगितले. फळ व भाजीपाला विक्रेत्यांनी व्यवस्थित, सुरक्षित आणि ग्राहकांना सुलभ अशा जागेची मागणी पुढे मांडली. योग्य जागा उपलब्ध झाल्यास खरेदी-विक्री अधिक सोयीस्कर होईल आणि दिवसेंदिवस वाढणाऱ्या ग्राहक संख्येला देखील याचा लाभ होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

डी.पी. रोड परिसरातील व्यवसाय आणि जनजीवन अधिक सुरळीत, सुरक्षित आणि समृद्ध करण्यासाठी नागरिकांकडून आलेल्या सर्व सूचनांचा गांभीर्याने विचार करून योग्य उपाययोजना राबविण्यावर माझा विशेष भर राहील, असे काशिनाथ आप्पा बोंद्रे यांनी सांगितले. तसेच त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार