Home / राजकारण / चिखलीकरांना संकटात साथ अन् मदतीचा हात…! काशिनाथ आप्पा बोंद्रे हेच नाव मनामनात !

चिखलीकरांना संकटात साथ अन् मदतीचा हात…! काशिनाथ आप्पा बोंद्रे हेच नाव मनामनात !

चिखली : नगरपरिषद निवडणुकीचा माहोल तापलेला असताना नागरिकांच्या मनात एकच नाव जोरदारपणे उमटत आहे ते म्हणजे काशिनाथ आप्पा बोंद्रे. संकटात धावून पोहोचणारा मदतीचा हात, सर्वांना जोडणारा स्वच्छ प्रतिमा असलेला नेता आणि विकासाचा स्पष्ट रोडमॅप घेऊन मैदानात उतरलेला महाविकास आघाडीचा उमेदवार अशी त्यांची सर्वत्र ओळख निर्माण झाली आहे.

स्वच्छ चरित्र, सोज्वळ चेहरा आणि दयावान व्यक्तिमत्व चिखलीचा विश्वास असलेले काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्या दीर्घ सामाजिक व कार्यामुळे त्यांची प्रतिमा लोकहितावर केंद्रित राहिली आहे.कोणतीही अपेक्षा न ठेवता गरिब-गरजूंची मदत,विद्यार्थ्यांना मार्गदर्शन,नागरिकांच्या तातडीच्या गरजांना प्रतिसाद,कोणत्याही वाद–निंदा राजकारणापासून दूर असलेली त्यांची शैली यामुळे त्यांचा स्वच्छ आणि सोज्वळ चेहरा शहराच्या प्रत्येक प्रभागात घराघरात पोहोचला आहे. त्यांचा दयाळू आणि सौम्य स्वभाव लोकांना आपलेपणाची जाणीव करून देतो. हेच नेतृत्व आज चिखलीला आवश्यक असल्याचे नागरिक खुलेपणाने सांगताना दिसत आहेत.

भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त चिखलीचे स्वप्न
नागरिकांनी गेल्या काही वर्षांत अनुभवलेले प्रश्न,प्रशासनातील गोंधळ,भ्रष्टाचाराच्या तक्रारी,नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमधील विलंब,कामांसाठीही त्रास यामुळे जनतेत नाराजी वाढलेली आहे. काशिनाथ बोंद्रे यांनी यावर ठाम भूमिका नोंदवली आहे. चिखली भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त करणे हेच आमचे पहिले ध्येय, असल्याचे त्यांनी जाहीरनाम्यात सांगितले आहे. काशिनाथ आप्पा बोंद्रे यांनी शहरासाठी सादर केलेले विकासधोरण अत्यंत अभ्यासपूर्ण व वास्तववादी आहे. त्यांचे व्हिजन लोकांना भावत असल्याने काशिनाथ आप्पा बोंद्रे हेच नाव चिखलीकरांच्या मनामनात असल्याचे दिसत

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार