चिखलीच्या विकासासाठी आघाडी हीच हमी : प्रा. नरेंद्र खेडेकर..!
शिवसेना नेते प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी सुरुवातीलाच भाजपा आणि महायुतीच्या कारभारावर जोरदार टिका करत जनसमुदायाला आवाहन केले की, शहराचा विकास काशिनाथ आप्पा बोंद्रेच करु शकतात. चिखलीसाठी सर्वसमावेशक,जात-धर्मभेदापलीचे नेतृत्व महाविकास आघाडी निर्माण करू शकते, असे त्यांनी सांगितले.
चिखलीकरांची महाविकास आघाडीसोबतच नाळ : नरेश शेळके..!
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके म्हणाले की, चिखलीला पाणी, रस्ते व आरोग्य यांसारख्या मूलभूत गरजांसह शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे. भाजपच्या फक्त खोट्या आश्वासनांनी चिखली बदलणार नाही . त्यासाठी इच्छाशक्ती आणि पारदर्शकता लागते. ती आघाडीकडे आहे. लोकांचा विश्वास आणि आशीर्वाद आमचा विजय निश्चित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले
धर्मांध शक्तींना थारा नाही : राहुल भाऊ बोंद्रे…!
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे यांनी नेहमीप्रमाणेच आक्रमक भूमिकेतून महायुतीवर जोरदार टीका केली. चिखलीत भीतीमुक्त, द्वेषमुक्त, सर्वसमावेशक शासन उभं करायचं असेल तर महाविकास आघाडीला पर्याय नाही. जातीय आणि धर्मांध राजकारणाच्या विरोधात जनता आता सजग झाली आहे. या निवडणुकीत विजय केवळ राजकीय नव्हे तर विचारांचा असेल.चिखलीतील ही एकजूट आणि जनसंपर्कातून उभा राहणारा जनसमर्थनाचा महापूर आघाडीला निर्णायक व भक्कम विजयाचा मार्ग दाखवेल, असा ठाम विश्वासही राहुल भाऊंनी व्यक्त केला.






