Home / Uncategorized / सावळदबारा येथे भाजपाच्या ऐतिहासिक प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन; मा. माहीन इद्रिस मुलतानी यांच्या प्रचाराचा शुभारंभ

सावळदबारा येथे भाजपाच्या ऐतिहासिक प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन; मा. माहीन इद्रिस मुलतानी यांच्या प्रचाराचा शुभारंभ

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी  :  गोकुळसिंग राजपूत 

एक वेळ, एकच ध्येय – विजय!” सावळदबारा येथे भाजपाचा प्रचार श्रीगणेशा; कार्यकर्त्यांत उत्साह, जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सावळदबारा (ता. सोयगाव) :

सोयगाव तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने अत्यंत नियोजनबद्ध व ऐतिहासिक पद्धतीने प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. सावळदबारा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपाच्या प्रचार कार्यालयाचे दि. ३० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले.

या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा परिषद फर्दापूर गटाचे अधिकृत व लोकप्रिय उमेदवार मा. माहीन इद्रिस मुलतानी, पंचायत समिती फर्दापूर गणाचे उमेदवार राहुल अंकुश राठोड तसेच पंचायत समिती सावळदबारा गणाचे उमेदवार उत्तम महारु चव्हाण (देव्हारी) यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संपन्न झाले.

या वेळी सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांवर नारळ फोडून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यामधून सामाजिक सलोखा, एकता व सर्वसमावेशकतेचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमस्थळी भाजपाचे सोयगाव तालुक्यातील तसेच सावळदबारा परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावोगावी उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे असलेले कार्यकर्त्यांचे भक्कम संघटन, नियोजनबद्ध प्रचारयंत्रणा आणि जनसामान्यांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता भाजपाची ताकद अधिक ठळकपणे दिसून येत आहे. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनामुळे फर्दापूर व सावळदबारा गणातील प्रचाराला नवसंजीवनी मिळाली आहे.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह, आत्मविश्वास आणि निर्धार दिसून आला. “एक वेळ, एकच ध्येय – विजय!” ही भावना संपूर्ण परिसरात अनुभवायला मिळाली.

फर्दापूर व सावळदबारा गणातून भाजपाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा ठाम विश्वास अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश चव्हाण व माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव बुढाळ यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.

कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले असून आगामी काळात भाजपाचा प्रचार अधिक जोमाने व प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रा. जीवन कोलते पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार