Home / Uncategorized / माणुसकी वृध्द आश्रमात संत सेना महाराजांची पुण्यतिथी साजरी….

माणुसकी वृध्द आश्रमात संत सेना महाराजांची पुण्यतिथी साजरी….

छत्रपती संभाजी नगर(छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी श्रीपाद पवार)

राष्ट संत सेना महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने सु-लक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे हे १० वे वर्षे आहे,समाजसेवक सुमित पंडित यांनी संत सेना महाराज यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून पुजन केले,सौ.पुजा सुमित पंडित यांच्या हस्ते संत सेना महाराजांची महाआरती करुन या कार्यक्रमाची सुरवात केली.सुमित यांनी संत सेना महाराजांच्या जीवनकाळावर प्रकाश टाकत “चित्त नाहीं हातीं करूं जाता हरिभक्ति॥ मज तुली वासना।भेटी द्यावी नारायणा॥कोण जाणे दानधर्म।नव्हे स्वतंत्र कैचें कर्म॥सेना म्हणे सांगें मात।जेणें माझें होय हित॥सेना म्हणे करा रे बदल| वरिवर्तनाचे गुण आचरावे|| उपस्थितांना मार्गदर्शन केले,

संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त माणुसकी वृध्द आश्रमात महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी चार्ली फाउंडेशन चे सोमनाथ स्वभावणे,

समाजसेवक सुमित पंडित,

मुबारक शहा सर,विजय निंबाळकर,देविदास पंडित, प्रदिप भाले,समाजसेविका पुजा पंडित,यासमीन शाह,लक्ष्मी पंडित, व वृद्ध आश्रमातील वृद्ध आदिंनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार