
चिखली शहरातील मतदार म्हणताय…
काशिनाथ आप्पा यांचा दयाळू स्वभाव, लोकांच्या वेदना मनापासून समजून घेण्याची वृत्ती आणि कोणत्याही घटकातील नागरिकांना समान न्याय देण्याची भूमिका, हे त्यांचे नेतृत्व अधिक प्रभावी ठरवत आहे. गरीबी, बेरोजगारी, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा, तसेच हातगाडीधारक, व्यापारी, महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक यांच्या समस्या ते प्रामाणिकपणे समजून घेऊन त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा जनतेत विश्वास निर्माण झाला आहे.
शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी त्यांनी स्पष्ट आणि ठोस दृष्टी मांडली आहे. रस्ते, नाली, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, सुशोभिकरण, डिजिटल सुविधा, तरुणांसाठी रोजगार व कौशल्यविकास या क्षेत्रात आधुनिक आणि व्यावहारिक उपाय सुचवून आप्पांनी विकास हा वचन नव्हे तर कृती,असा संदेश दिला आहे. शहराला भविष्यातील गरजांशी जुळवून आधुनिक सुविधा देत प्रगत चिखली घडवण्याचा त्यांचा रोडमॅप लोकांमध्ये उत्साह निर्माण करतो.
काशिनाथ आप्पा यांची सर्वधर्मसमभावाची भूमिका
काशिनाथ आप्पा बोंद्रे यांची स्वच्छ प्रतिमा, पारदर्शक कारभाराची हमी आणि पक्षपाताशिवाय सर्वांसाठी काम करण्याची भूमिका यामुळे चिखलीकरांमध्ये त्यांच्याबद्दल अधिक विश्वास निर्माण होत आहे. सर्वधर्मसमभाव, सामाजिक ऐक्य, आणि सौहार्द जपण्याची त्यांची भूमिका शहरातील सर्व समाजघटकांना जवळ घेणारी ठरत आहे. शहरातील तरुणांमध्येही आप्पांविषयी आकर्षण आहे. रोजगाराच्या संधी, उद्योजकतेला चालना, डिजिटल सुविधा आणि आधुनिक पायाभूत सुविधा यांच्या माध्यमातून चिखलीला पुढील टप्प्यावर नेण्याची त्यांची तयारी तरुणांमध्ये आशावाद निर्माण करणारी आहे.



