
विशेष म्हणजे सर्व समाजघटकातून महाविकास आघाडीला मिळणारा तुफान पाठिंबा हा या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. व्यापारी, हातगाडीवाले, महिला वर्ग, युवक, ज्येष्ठ नागरिक, कामगार, शेतकरी, ओबीसी, मराठा,दलित, मुस्लिम, अल्पसंख्याक या सर्वच समाज घटकातून आघाडीच्या उमेदवारांविषयी स्पष्ट विश्वास व्यक्त केला जात आहे.
जनतेमध्ये चर्चेचा मुख्य विषय बनलेले नेतृत्व म्हणजे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे. त्यांचे दयावान, लोकाभिमुख व विकासाभिमुख व्यक्तिमत्त्व शहरभर चर्चेत आहे. त्यांनी केलेले प्रभागनिहाय दौरे, नागरिकांसोबतचे संवाद, समस्यांवर दिलेली तत्काळ प्रतिक्रिया आणि भविष्याचा स्पष्ट विकास आराखडा यामुळे मतदारांमध्ये त्यांच्या बाजूने सर्वच प्रभागांमध्ये सकारात्मक लाट दिसून येत आहे.
चिखली शहरातील एकता, सलोखा आणि विकासाचे राजकारण जपणाऱ्या महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मिळणारा हा व्यापक पाठिंबा पाहता, निवडणुकीत मविआचाच विजय होईल, असा अंदाज स्थानिक राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
सभेला जमणारी गर्दी ही मविआची विजयाची चाहूल
महाविकास आघाडीचे स्थानिक तसेच जिल्हास्तरीय नेते सलग प्रचारात गुंतले असून प्रत्येक सभेला मिळणारी गर्दी ही मविआच्या विजयाची चाहूल म्हणून पाहिली जात आहे. विकास हवा आणि त्यासाठी मविआच हवी अशी भावना मोठ्या प्रमाणात जनतेतून उमटताना दिसत आहे. एकंदरीत शहरात वाऱ्याचा वेग नाही तर झंझावातच!आणि हा झंझावात महाविकास आघाडीचा असल्याचे चित्र सर्वत्र स्पष्ट झाले आहे.



