छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
अपेक्षा उंचावल्या; कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याचा निर्धार
गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रणासाठी कठोर पावले उचलण्याचे संकेत
सोयगाव पोलीस स्टेशनमध्ये नव्याने नियुक्त झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) दिनकर गोरे यांनी पदभार स्वीकारताच परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी फर्दापूर पोलीस स्टेशनची जबाबदारी सांभाळणारे सपोनि पकज बारवाल यांची बदली छत्रपती संभाजीनगर येथे झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदाची धुरा आता सपोनि दिनकर गोरे यांनी स्वीकारली आहे.
या नियुक्तीच्या निमित्ताने अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने सपोनि दिनकरर गोरे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी समितीचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा उपसंपादक गोकुळसिंग राजपूत, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप देशमुख तसेच तालुका उपाध्यक्ष तथा पत्रकार सुनील चोरमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्कार समारंभात उपस्थित मान्यवरांनी सपोनि दिनकर गोरे यांचे स्वागत करताना त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. सोयगाव परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास यावेळी उपसपादक गोकुळसिग राजपूत याच्या कडून व्यक्त करण्यात आला.
सोयगाव हे पर्यटनदृष्ट्या तसेच व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठिकाण असल्याने पोलीस प्रशासनावर मोठी जबाबदारी असते. वाढती लोकसंख्या, वाहतूक व्यवस्था, सामाजिक प्रश्न तसेच विविध प्रकारच्या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता असते. या पार्श्वभूमीवर सपोनि दिनकर गोरे यांच्या नियुक्तीकडे नागरिक आशेने पाहत आहेत.
नवीन पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस स्टेशनच्या कामकाजात अधिक पारदर्शकता, शिस्त आणि जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करून कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असेही उपस्थितांनी सांगितले.
यावेळी बोलताना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासन व नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ होणे गरजेचे असल्याचे नमूद केले. समाजातील शांतता, सुरक्षितता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभाग आणि सामाजिक संघटनांनी एकत्रितपणे काम करणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
सपोनि दिनकर गोरे यांच्या नेतृत्वाखाली सोयगाव पोलीस स्टेशनला नवी दिशा मिळेल, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण येईल आणि नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निराकरण होईल, असा विश्वास व्यक्त करत उपस्थितांनी त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.






