Home / Uncategorized / महावितरणचे टेक्निकल ऑपरेटर मंगेश धनोकर यांचा सावळदबारा येथे सेवागौरव सोहळा उत्साहात संपन्न…

महावितरणचे टेक्निकल ऑपरेटर मंगेश धनोकर यांचा सावळदबारा येथे सेवागौरव सोहळा उत्साहात संपन्न…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत

१३ वर्षांच्या उल्लेखनीय सेवेनंतर जळगाव येथे बदली; ग्रामस्थ, पदाधिकारी व महावितरण कर्मचाऱ्यांकडून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील महावितरण कंपनीचे टेक्निकल ऑपरेटर मंगेश धनोकर यांची जळगाव येथे बदली झाल्याने त्यांच्या सेवापूर्ती व गौरवार्थ सावळदबारा येथे भावपूर्ण सेवागौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. महावितरण कर्मचारी तथा लाईनमन ज्ञानेश्वर घोडके यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, पत्रकार व महावितरण कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंगेश धनोकर यांनी सावळदबारा परिसरात तब्बल १३ वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावत वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने कार्य केले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक अडचणींवर मात करत नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या कर्तव्यदक्ष, मनमिळाऊ व सेवाभावी स्वभावामुळे ते सावळदबारा परिसरातील अठरा गावांमध्ये “बापू” या नावाने परिचित झाले होते.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी धनोकर यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या सेवाभाव, कष्टाळूपणा व लोकसंपर्क कौशल्याचे कौतुक केले. ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय असल्याचे वक्त्यांनी सांगितले. बदलीनंतरही त्यांनी याच तत्परतेने नवीन कार्यक्षेत्रात काम करून महावितरणचे नाव उंचावावे, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.

यावेळी मंगेश धनोकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना धनोकर यांनी सावळदबारा परिसरातील नागरिक, लोकप्रतिनिधी व सहकारी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या प्रेम, सहकार्य व सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या परिसरातील नागरिकांशी निर्माण झालेले ऋणानुबंध आयुष्यभर कायम राहतील, असे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी महावितरणचे कर्मचारी ज्ञानेश्वर घोडके, वैभव ठाकूर, फाल्गुन मोरे, भगतसिंग परदेशी, नितीन जाधव, विजय बावणे यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार बांधव, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

जळगाव येथे बदली झालेल्या महावितरणचे टेक्निकल ऑपरेटर मंगेश धनोकर यांचा सावळदबारा येथे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार