Home / Uncategorized / फर्दापूर पोलीस ठाण्याच्या नव्या प्रभारी अधिकाऱ्यांचा अवैध धंद्यांवर धडक कारवाईचा बडगा. सपोनि सुधीर मोटे यांचा दणका; ..

फर्दापूर पोलीस ठाण्याच्या नव्या प्रभारी अधिकाऱ्यांचा अवैध धंद्यांवर धडक कारवाईचा बडगा. सपोनि सुधीर मोटे यांचा दणका; ..

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत

गावठी दारू व मटका व्यवसायाविरोधात ६ गुन्हे दाखल, ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त

फर्दापूर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर भाऊसाहेब मोटे यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेत पोलीस ठाणे हद्दीतील बेकायदेशीर व्यवसायांवर धडक कारवाई सुरू केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्री तसेच मटका व्यवसायावर सलग कारवाया करून अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणून सोडले आहेत.

फर्दापूर पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सपोनि सुधीर मोटे यांनी आपल्या पथकासह हद्दीतील विविध गावांमध्ये छापेमारी मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या व विक्री करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध ५ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच विनापरवाना बेकायदेशीररित्या कल्याण मटका जुगार चालविणाऱ्या एका इसमावरही कारवाई करून गुन्हा नोंदविण्यात आला.

या सर्व कारवायांमध्ये एकूण ४४ हजार ७० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या काही वस्तू नाशवंत स्वरूपाच्या असल्याने पंचासमक्ष त्यांचा नाश करण्यात आला. पोलीस विभागाच्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून सर्वसामान्य नागरिकांकडून या मोहिमेचे स्वागत केले जात आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

फर्दापूर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पुढील काळातही अशाच प्रकारच्या धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत पोलीस विभागाकडून मिळत आहेत. ही माहिती ठाणे अंमलदार निलेश लोखंडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार