Home / Uncategorized / पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी मानोरा येथे महादेव मंदिरात आरती व अभिषेक…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी मानोरा येथे महादेव मंदिरात आरती व अभिषेक…

मानोरा प्रतिनिधी सुधीर ढगे

आज 10 जून 2026 रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी सर्वकाळ हिंदुस्तानची सेवा करणारे आणि जनतेतून निवडून येणारे पंतप्रधान म्हणून गौरव प्राप्त करीत आहे… ही तुम्हा आम्हा आणि संपूर्ण हिंदुस्तान वसिया साठी गौरवशाली
बाब असल्या कारणाने भाजपा मंडळ मानोरा च्या वतीने मानोरा वसंत नगर येथील जय भोले कावड मंदिरात भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्य आणि जय भोले कावड मंडळाच्या वतीने शिवलिंग आणि नंदी महाराजाची आरती , पुजन व अभिषेक करण्यात आला. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, त्यांच्या हातून अजून दहा वर्ष देश सेवा घडो यासाठी प्रार्थना करण्यात आली. उपस्थितांना मोतीचूरचे लाडू प्रसाद रुपी देण्यात आले.
यावेळी भाजपा तालुका मंडळ अध्यक्ष अरविंद इंगोले, भाजपा तालुका सरचिटणीस राजेंद्र देशमुख, स्थानिक जेष्ठ नागरिक रामकृष्ण गावंडे, रामाप्पा बेंद्रे, दहापुते साहेब, मनीराम भाऊ सुरजुसे, पत्रकार सुधीर ढगे,सुनील म्हात्रे वैद्यकीय आघाडीचे डॉ. सुहास देशमुख. दिलीप चव्हाण डॉ. हरीश नवहाल. दिगंबर लोंढे सौ लोंढे ताई, विशाल यावलकर, भैय्यासाहेब देशमुख, विनायक पाटील, नरेंद्र खूपसे, राम देशमुख, अमोल राऊत, प्रमोद ठाकरे, अतुल राऊत, प्रताब डांगे, अंकित बेंद्रे ,रवी गवई, सर्वेश बेंद्रे, सागर भाकरे ,भूषण आसरे, गोलू आमटे, व शिवभक्त उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार