Home / राजकारण / कपिल खेड़ेकर यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिवसेना निवडणूक निरीक्षकपदी नियुक्ती

कपिल खेड़ेकर यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिवसेना निवडणूक निरीक्षकपदी नियुक्ती

चिखली (प्रतिनिधी प्रशांत जैवाळ): चिखली विधानसभा मतदारसंघातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला आता वेग आला असून, कपिल भास्कर खेड़ेकर यांची शिवसेना (शिंदे गट) तर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार संजय रामभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वात त्यांच्या हस्ते करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही जबाबदारी देण्यात आली असून, कपिल खेड़ेकर हे चिखली विधानसभेअंतर्गत चिखली नगरपरिषद, जिल्हा परिषद सर्कल आणि पंचायत समिती सर्कल येथील स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरिता समन्वय, नियोजन व देखरेख करतील.

या नियुक्तीचे पत्र आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पक्ष संघटनेच्या बळकटीकरणासाठी ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

कपिल खेड़ेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या संघटनात्मक कामात सक्रिय असून, पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांशी असलेली जवळीक या गुणांमुळे त्यांची निवड करण्यात आल्याची माहिती पक्ष सूत्रांकडून देण्यात आली.

या नियुक्तीमुळे चिखली तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य, उत्साह आणि आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेला नवे बळ मिळेल, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार