Home / Uncategorized / शिवाजी विद्यालय सावळदबाराची शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान कामगिरी; पूर्वा थोटे तालुक्यात प्रथम…

शिवाजी विद्यालय सावळदबाराची शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान कामगिरी; पूर्वा थोटे तालुक्यात प्रथम…

छत्रपती संभाजीनगर गोकुळसिंग राजपूत 

संस्थेचे अध्यक्ष भाऊराव कोलते कडून गुणवंत विद्यार्थिनीचा जाहीर सत्कार; पालक, शिक्षक व शाळेच्या यशस्वी परंपरेला मानाचा मुजरा

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील शिवाजी विद्यालयाचा महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये शिवाजी विद्यालय, सावळदबारा यांनी पुन्हा एकदा आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयाची विद्यार्थिनी कु. पूर्वा सोपान थोटे हिने इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून विद्यालय, पालक आणि गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.

पूर्वाच्या या दैदिप्यमान यशामुळे सावळदबारा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या यशामागे तिची मेहनत, पालकांचे प्रोत्साहन, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि विद्यालयातील गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण यांचा मोठा वाटा असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष भाऊराव कोलते व प्रभारी प्राचार्य जीवन कोलते पाटील यांच्या हस्ते कु. पूर्वा सोपान थोटे हिचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनीच्या गुणवत्तेचे कौतुक करत तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यालयाने सातत्याने विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, स्पर्धात्मकता आणि अभ्यासाची आवड निर्माण करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या यशापर्यंत पोहोचविल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

सत्कार समारंभाला माजी प्राचार्य एन. आर. कोलते पाटील, संस्थेच्या सचिव रत्नाताई पंजाबराव कोलते पाटील, प्रभारी प्राचार्य जीवन कोलते पाटील, विकास पाटील, विजयसिंग राजपूत, अमोल कोलते पाटील, अंकुश कोलते, भास्कर खमाट, मुकुंदा व्यवहारे, भास्कर ससाने, सुदाम राठोड, ज्ञानेश्वर राठोड, भूषण देसले, पोपटराव सोनवणे, भाजपराव चव्हाण, श्याम जाधव, राहुल बडक, बाबासाहेब कोलते, गजानन चव्हाण यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व सांगत कठोर परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मोठे यश मिळविता येते, असा प्रेरणादायी संदेश दिला. पूर्वाच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून शिवाजी विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

शेवटी उपस्थितांनी कु. पूर्वा सोपान थोटे हिचे, तिच्या पालकांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे व विद्यालयाच्या संपूर्ण शिक्षकवृंदाचे मनःपूर्वक अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार