Home / Uncategorized / मिशन लक्ष्यवेध’ मैदानी स्पर्धेसाठी प्रसाद सोनवणेची निवड; डॉ रणजीत पाटील यांची माहिती…

मिशन लक्ष्यवेध’ मैदानी स्पर्धेसाठी प्रसाद सोनवणेची निवड; डॉ रणजीत पाटील यांची माहिती…

जळगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी

जळगाव : स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव येथील विद्यार्थी कुमार प्रसाद सोनवणे याची ‘मिशन लक्ष्यवेध जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्र’ आयोजित मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्रसादने आपल्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याच्या जोरावर ही उल्लेखनीय निवड मिळविल्याने महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रसाद सोनवणे याने सातत्यपूर्ण सराव, मेहनत, जिद्द आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. ‘मिशन लक्ष्यवेध’च्या माध्यमातून जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध होत असून, या निवडीतून प्रसादच्या क्रीडा कारकिर्दीला नवी दिशा मिळणार आहे.

प्रसादच्या या यशाबद्दल स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले. डॉ. श्री. केतन नारखेडे (प्रभारी प्राचार्य, एम.जे. स्वायत्त महाविद्यालय), प्रा. श्री. आर. बी. ठाकरे (समन्वयक, के.सी.ई. सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय), प्रा. सौ. स्वाती बऱ्हाटे (समन्वयक, के.सी.ई. सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय), प्रा. सौ. राजश्री महाजन (उपप्राचार्य), प्रा. सौ. शिल्पा सरोदे (पर्यवेक्षिका), प्रा. श्री. उमेश पाटील (समन्वयक, कला व वाणिज्य शाखा), प्रा. श्री. गुणवंत वंजारी (समन्वयक, विज्ञान शाखा) तसेच प्रा. सौ. वर्षा पाटील (चेअरमन, जिमखाना समिती) यांनी प्रसादचे कौतुक करून त्याला पुढील क्रीडा वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

प्रसादला महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक डॉ. रणजीत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. नियमित सराव, शिस्तबद्ध तयारी आणि योग्य मार्गदर्शनामुळे प्रसादने ही कामगिरी साध्य केल्याचे सांगण्यात आले.

या निवडीमुळे प्रसादचे पालक, शिक्षक, मित्रपरिवार तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. त्याने भविष्यातही आपल्या क्रीडा कौशल्याच्या जोरावर जळगाव जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत बोलताना डॉ. रणजीत पाटील, क्रीडा शिक्षक यांनी सांगितले की, प्रसादने मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ही संधी मिळवली असून, आगामी स्पर्धांमध्येही तो निश्चितच चांगली कामगिरी करेल. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार