Home / Uncategorized / राष्ट्रीय UUT 1st Para रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेसाठी स्वनिक भावसारची निवड…

राष्ट्रीय UUT 1st Para रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेसाठी स्वनिक भावसारची निवड…

जळगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव

जळगाव: स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा होतकरू खेळाडू कु. स्वनिक भावसार याची राष्ट्रीय UUT 1st Para रँकिंग टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयासह पालकवर्ग आणि जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्वनिकने आपल्या मेहनतीच्या, सातत्यपूर्ण सरावाच्या आणि जिद्दीच्या जोरावर टेबल टेनिस क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत स्थान मिळविले आहे. त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्याचे विशेष कौतुक करून पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी डॉ. श्री. केतन नारखेडे (प्रभारी प्राचार्य, एम.जे. स्वायत्त महाविद्यालय), प्रा. श्री. आर. बी. ठाकरे (समन्वयक, के.सी.ई. सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय), प्रा. सौ. स्वाती बऱ्हाटे (समन्वयक, के.सी.ई. सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय), प्रा. सौ. राजश्री महाजन (उपप्राचार्य), प्रा. सौ. शिल्पा सरोदे (पर्यवेक्षिका), प्रा. श्री. उमेश पाटील (समन्वयक, कला व वाणिज्य शाखा), प्रा. श्री. गुणवंत वंजारी (समन्वयक, विज्ञान शाखा) आणि प्रा. सौ. वर्षा पाटील (चेअरमन, जिमखाना समिती) यांनी स्वनिकचे अभिनंदन करून त्याच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

स्वनिकला डॉ. रणजीत पाटील (क्रीडा शिक्षक) तसेच श्री. एस. जाधव (प्रशिक्षक) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वनिकने सातत्याने सराव करत आपल्या खेळात प्रगती साधली.

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी झालेली निवड ही स्वनिकच्या मेहनतीची आणि क्रीडा कौशल्याची पावती असून, त्याच्या या यशामुळे महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल झाले आहे. स्वनिकने आगामी स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयासह जळगाव जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा यावेळी मान्यवरांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार