Home / Uncategorized / तरुणाई जेंव्हा ऐकवटते ————-

तरुणाई जेंव्हा ऐकवटते ————-

 

जगातील तरुण वर्ग अत्यंत संवेदनशील व भावनिक तसेच स्वाभिमानी ही असतो.आजची तरुणाई ही अत्यंत संवेदनशील आहे.या तरुणाईची मानसिकता व भावनिकता जाणून त्या अनुषंगाने व्यवहार आवश्यक आहेत.आजचा तरुण वर्ग हा उच्च विद्या विभूषित , अभ्यासु व संवेदनशील आहे.जगात अनेक देशातील तरुण-तरुणी अन्याय,अत्याचार,व शिक्षणाबाबत जर सरकार अनास्था दाखवीत असतील तर अशा अनास्थेत विरुद्ध आवाज उठवून न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करीत असतात.

देशात विविध परीक्षाबाबत झालेली पेपर फुटी,विविध स्पर्धा परिक्षातील गोंधळ, वाढत असलेला भ्रष्टाचार हा अत्युच्च शिखरावर पोहचलेला होता. यामुळे अभ्यासु,प्रामाणिक झव् परिश्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा एक प्रकारे अन्याय होता.पेपर फुटी

किंवा भ्रष्टाचार यामुळे जे या मार्गाचा अवलंब करीत होते नेमके तेच उत्तीर्ण होऊन रोजगार पात्र ठरत असत किंवा “ढ” विद्यार्थी वामार्गाने जाऊन प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होत असत ,हा गोरख धंदा बऱ्याच वर्षा पासून चालू होता त्यामुळे हुशार व बुद्धिमान मुलांवर अन्याय होत असे,या गोरख धंद्यामुळे अनेकांनी परीक्षेतील अपयशाने खचून जाऊन आत्महत्या केली. तरीही सरकार जागे होईना ,म्हणून विद्यार्थ्यांनी या गोरख धंद्याविरुद्ध एकजूट होऊन जो लढा दिला व देत आहेत त्यामुळे सरकारला आपल्या दुर्लक्ष्याची जाणीव झाली व त्यांनी आता आपली जबाबदारी ओळखून लक्ष घालायला सुरुवात केली.

कोणत्याही देशातील तरुणाई जेंव्हा,जेंव्हा अन्याय विरुद्ध एकवटते व आपल्या मागण्या सादर करते तेंव्हा, तेंव्हा शासनाला तरुणाईचे ऐकावेच लागते.

देशातील तरुण एकवटली व त्यांनी आपल्या एकजुटीने चुका निदर्शनाला आणून दिल्या हे योग्य झाले मात्र या एकवटलेल्या  तरुणाईने देशात किंवा राज्यात विध्वंसक ,विघातक कार्य करायला नकोत.आपल्याल देशात किंवा राज्यात विध्वंसक ,विघातक कार्य करायला नकोत.आपल्याला घटनेने अधिकार दिलेला आहे, तो अधिकार आपण रास्त मार्गाने जरूर व्यक्त करावा परंतु  संयम व सामंजस्य व शांतता मार्ग स्वीकरावा.आपल्या आंदोलनाचा फायदा काही विघातक शक्तींनी घेऊ नये या बाबत तरुणाईने अति सावध राहण्याची गरज आहे.तसेच सरकारी किंवा खाजगी वस्तू, मालमत्ताची तोडफोड ही योग्य नाही

संघटना मे  शक्ती है,किंवा एकीचे बळ ,आपण दाखवून दिले ते टिकावे अशी अपेक्षा.

धोंडीरामसिंह ध राजपूत,वैजापूर. संभाजीनगर.

मो.९४२१३१२२४४.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार