पंकज नागपुरे जिल्हा (प्रतिनिधी बुलढाणा)
स्थानिक जळगाव जामोद पोलिसांनी जुगार अड्ड्यावर कारवाई करत रक्कम 11 हजार720, दहा अँड्रॉइड मोबाईल किंमत 91 हजार रुपये, चार मोटर सायकली किंमत दोन लाख रुपये असा ऐकून तीन लाख 2750 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई दिनांक 2 नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. ही कारवाई जळगाव जामोद शहरातील पाटील नगरच्या बाजूच्या देविदास मेथे यांच्या शेतामध्ये करण्यात आली. या जुगार अड्ड्यावरील कारवाईत भास्कर काशीराम येऊल वय 40 वर्षे, गजानन विजयसिंह परिहार वय49 वर्षे, सुरेश पुंडलिक उगले वय 59 वर्षे, संदीप विष्णू बूले वय 33 वर्ष, गजानन नारायण भोपळे वय 40 वर्षे , विलास मनोहर उमाळे वय 43 वर्षे, अजय सिताराम अंबडकार वय 30वर्षे, अशोक पुंजाजी गव्हाळे 50 वर्षे सर्व राहणार जळगाव जामोद, दिलीप रमेश भोसले वय 25 वर्षे राहणार वाडी तालुका जळगाव जामोद, विनोद विद्यानंद जयस्वाल वय 25 वर्ष राहणार गोरखपूर उत्तर प्रदेश हे सर्व पैशाच्या हार जीत वर एक्का बादशहा नावाचा 52 ताशपत्ती जुगार खेळताना आढळून आले असून या दाही जणांच्या ताब्यातून रक्कम 1हजार 720 , दहा मोबाईल किंमत 91 हजार रुपये, चार मोटरसायकल किंमत दोन लाख रुपये असे एकूण तीन लाख 2 हजार 750 रुपयाचा मुद्देमात जप्त केला की ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे , अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या आदेशाने जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक इरफान शेख , पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल संदीप रिंढे, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल धांदर, परमेश्वर ढोण, स्वप्निल मस्के, स्वप्निल झुंजारकर यांनी केली. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहे
शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी 25 ऑक्टोबर रोजी तालुक्यातील अवैद्य धंदे बंद करण्याची शिवसेनेच्या वतीने निवेद देण्यात आले होते हे विशेष






