Home / महाराष्ट्र / वाशिम / सेवानिवृत्त ग्राम महसूल अधिकारी श्री अरुण राठोड तळप जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढणार!

सेवानिवृत्त ग्राम महसूल अधिकारी श्री अरुण राठोड तळप जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढणार!

मानोरा प्रतिनिधी :- सुधीर भाऊ ढगे
स्थानिक स्वराज्य संस्थांनाच्या जिल्हा परिषद होणाऱ्या निवडणुकीत सावरगाव येथील प्रतिष्टीत तथा सेवानिवृत्त ग्राम महसूल अधिकारी श्री अरुण भाऊ राठोड हे राष्ट्रवादी कडून दावेदारी करणार आहे.

अरुण राठोड यांनी आपली संपूर्ण नोकरीं मानोरा तालुक्यात झाली असून त्यांना तळप सर्कल मध्ये मानणारा मोठा वर्ग आहे. विशेष म्हणजे जन्म गाव बोरव्हा असून सावरगाव हे त्यांचे गाव आणी तळप रामतीर्थ हे गट ग्राम पंचायत असल्याने त्यांचे नाव सर्व परिचित असल्याने त्यांना तळप सर्कल ची दावेदारी पासून कोणीही रोखू शकत नाही आपल्या कार्यकाळात त्यांनी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत व मार्गदर्शन केंद्र म्हणून त्यांचे नाव आजही शेतकऱ्यांच्या मनात घर करून आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात तहसीलदार यांच्या सोबत खाद्याला खांदा लावून काम केल्यामुळे आज पर्यंतच्या गोपनीय अहवाला वरून कळते.

त्यांची सामाजिक व राजकीय पकड अतिशय दांडगा असून प्रशासन सांभाळून शिक्षनाचे जाळे संपूर्ण मानोरामध्ये विनले आहेत तालुक्यातील विध्यार्थी यांच्या करिता जे एस पब्लिक स्कुल ची स्थापना केली आहे तसेच शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे त्यासाठी त्यांनी मानोरा येथे श्री अरुण भाऊ राठोड शेतकरी उत्पादक कपंनी ची स्थापना करून अनेक शेतकऱ्यांना आपल्या कपंनीशी जुळवून घेतले आहे. अरुण भाऊ राठोड हे एकेकाळी तत्कालीन आमदार स्व प्रकाश दादा डहाके यांचे खंदे समर्थक होते तेंव्हापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच होते त्यांच्या धर्मपत्नी सौं कविता राठोड ह्या मानोरा तालुक्याच्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या महिला तालुका अध्यक्ष आहेत.आणी येणाऱ्या जि प तळप सर्कल चे ते उमेदवार असू शकतात यात शन्का नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार