Home / शिक्षण / अटल बिहारी वाजपेयी सेवा रत्न सन्मान 2025 प्रशांत ढोरे पाटील यांना जाहीर

अटल बिहारी वाजपेयी सेवा रत्न सन्मान 2025 प्रशांत ढोरे पाटील यांना जाहीर

चिखली: नीती आयोग मान्यताप्राप्त आणि भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (MSME) अंतर्गत कार्यरत जीवन जागृती सेवा संस्थान तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित “अटल बिहारी वाजपेयी सेवा रत्न सन्मान 2025” कोटा (राजस्थान) येथे कार्यरत असलेल्या प्रशांत पुरुषोत्तम ढोरे पाटील यांना जाहीर झाला आहे.सामाजिक सेवा, मार्गदर्शन आणि मानसिक आरोग्य जागृती यांसह शेतकरी बांधवांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या प्रशांत पाटील यांचे कार्य राज्यभरात प्रसिद्ध आहे. JEE आणि NEET परीक्षार्थी हजारो विद्यार्थ्यांना करिअर काउन्सिलिंगद्वारे योग्य दिशा देण्याचे त्यांनी केलेले मोलाचे मार्गदर्शन विशेष कौतुकास्पद ठरले आहे. आजपर्यंत त्यांच्या बहुआयामी कार्याचा गौरव म्हणून १६ राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाले असून, या नव्या सन्मानामुळे बुलढाणा जिल्ह्याचा मान आणखी उंचावला आहे. सन्मान जाहीर तारीख: २७ ऑक्टोबर २०२५पुरस्कार संस्था: जीवन जागृती सेवा संस्थान (नीती आयोग मान्यताप्राप्त, MSME मंत्रालय अंतर्गत)प्रशांत ढोरे पाटील यांच्या या उपलब्धीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार