देऊळगाव राजा / (लोकमहाराष्ट्र वृत्तसेवा):-देशाचे लोह पुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी “राष्ट्रीय एकता दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व पोलीस स्टेशन स्तरावर ‘वॉक फॉर युनिटी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा उद्देश समाजामध्ये राष्ट्रीय एकता, भाईचारा आणि सामंजस्याचा संदेश पोहोचविणे असा असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे

आवाहन बुलडाणा पोलीस अधीक्षक मा निलेश तांबे, व तालुका स्तरावर उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम मॅडम, पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी सर यांनी केले आहे. कार्यक्रम पोलिस स्टेशन परिसरात 31 ऑक्टोबर रोजी सकाळी ७.०० वा. करण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून एकात्मतेचे संदेश देत पथसंचलन काढले जाईल. यामध्ये पोलिस अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, लतसेच नागरिक सहभागी होणार आहेत.पोलीस विभागाच्या या उपक्रमाद्वारे समाजातील विविध घटकांना एकत्र आणत एकतेचा संदेश देण्याचे कार्य होणार आहे.
राष्ट्रीय एकतेच्या यात्रेत आपण सर्वांनी मोठ्या संख्येने एकत्र सहभागी व्हावे…
“मिशन परिवर्तन नक्कीच
एक दिशा देणारे उपक्रम, मा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम येत्या 31 ऑक्टोबर ला घेण्यात येणार आहे तरी या राष्ट्रीय एकतेच्या यात्रेत आपण सर्वांनी मोठ्या संख्येने एकत्र सहभागी व्हावे, देश एकसंघ ठेवण्याचा संकल्प करूया.”
▲ मा.मनीषा कदम
उपविभागीय पोलीस अधिकारी
देऊळगाव राजा
▪️ सरदार वल्लभभाई पटेल यांनी या भारत देशाला एकसंघ केले..
समाजात एकोपा, भाईचारा आणि राष्ट्रीय एकता टिकवून ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी या भारत देशाला एकसंघ केले, त्यांचा आदर्श आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या उपक्रमात उपस्थित राहावे.
मा. पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी
देऊळगाव राजा





