Home / महाराष्ट्र / बुलढाणा / पोलीस नाकाबंदीत दारू तस्करीचा पर्दाफाश; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलीस नाकाबंदीत दारू तस्करीचा पर्दाफाश; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

रायपुर (बुलढाणा): रायपुर पोलीस स्टेशनसमोर घातलेल्या नाकाबंदी दरम्यान पोलीस पथकाने संशयास्पद मोटारसायकल रोखत अवैध दारू वाहतुकीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असून, जप्त मालासह पुढील तपास सुरू आहे.प्राप्त माहितीनुसार, २५ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री अंदाजे ८.३० वाजता पोका/अजरोदीन मोबीनोदीन काझी (ब.न. १७) यांच्या पथकाने नाकाबंदी दरम्यान एम.एच. २८ ए.आर. ८९४१ क्रमांकाची मोटारसायकल संशयास्पद हालचाली करताना हेरली. मोटारसायकलवरील पोतडीची चौकशी केली असता चालकाने आपले नाव ज्ञानेश्वर रामराव अवघडे (वय ४८) तर मागील सीटवरील व्यक्तीने रामेश्वर रामराव अवघडे (वय ४१, दोन्ही रा. रायपुर, ता. जि. बुलढाणा) असल्याचे सांगितले. मात्र पोतडीबाबत उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत तपासणी केली.

जप्त केलेला मुद्देमाल पुढीलप्रमाणे:

• कोकण देशी दारू संत्रा ९९९ कंपनीच्या १८० एमएल सीलबंद ३५ शिश्या (किंमत अंदाजे ₹२८००/-)

• कोकण देशी दारू संत्रा ९९९ कंपनीच्या ९० एमएल सीलबंद ३५ शिश्या (किंमत अंदाजे ₹१४००/-) एकूण प्रोहिबिशन मालाची किंमत: ₹४२००/-गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल (एचएफ डिलक्स): ₹३५०००/-एकूण मुद्देमाल जप्त: ₹३९२००/- दारूच्या प्रत्येकी एक शिशी नमुन्यासाठी सील करून C.A. तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम ६५ (अ), (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर राहण्याबाबत समजपत्र देण्यात आले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार