
सवना : राष्ट्रीय स्तरावरील डॉ. होमीभाभा बाल वैज्ञानिक परीक्षा मध्ये जिल्हा परिषद शाळा सवना येथील जिल्ह्यात सर्वाधिक नऊ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेने उज्वल यश संपादन केले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व पात्र विद्यार्थी व शिक्षकवृंद यांचा माननीय श्री शरदनाना हाडे (जिल्हा परिषद सदस्य) व माननीय श्री भारतदादा हाडे तसेच समस्त गावकरी यांच्यावतीने भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.



या कार्यक्रमास मा. श्री दिपकभाऊ खडके (अध्यक्ष – शाळा व्यवस्थापन समिती), ज्ञानेश्वर भुसारी (उपाध्यक्ष), सौ. संगीताताई हाडे, श्री सुधाकर भाऊ भुतेकर, श्री संजय भाऊ जोशी, श्री विजय पवार, श्री योगेश आदमाने, श्री पुरुषोत्तम हाडे (सदस्य) यांच्यासह गावातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच श्री फिरोज खान, श्री पंजाब हाडे, श्री नंदुभाऊ हाडे, श्री पप्पू गाढवे, श्री पप्पू शिदे, श्री धनंजय गाढवे, श्री दत्ता दिनकर करवंदे, श्री दिलीप करवंदे, श्री अंकुशदादा बनसोडे, श्री शंकर भुसारी, श्री भारत गाढवे, श्री विनोद भुतेकर, श्री बाळू रांधवन, श्री सतीश नवले यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
याप्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला, तसेच सर्व गुरुजनवर्गाला माननीय श्री शरदनाना हाडे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
याआधीही माननीय शरदनाना हाडे यांनी शाळेच्या दिल्ली शैक्षणिक सहलीसाठी विद्यार्थ्यांच्या जाण्या-येण्याची व्यवस्था देणगी स्वरूपात करून शाळेला मोलाचे सहकार्य केले आहे. वेळोवेळी शाळेच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल उपस्थितांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
या यशामुळे जिल्हा परिषद शाळा सवना येथील शैक्षणिक गुणवत्तेला नवी उंची मिळाल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.





