Home / सोयगाव / जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन …

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन …

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा शेतकऱ्यांनी योजनेत अर्ज करावे; मंडळ अधिकारी आर जी गुंडिले 

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन…

 

 ( छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी) गोकुळसिंग राजपूत

सोयगाव तालुक्यात परिसरातील शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा हवामान अनुकूल शेती अनुषंगाने शासनाने काढलेला अत्यंत महत्त्वाकांशी प्रकल्प असून या प्रकल्पातून शेतकऱ्यांना विविध घटकांचा अनुदान पद्धतीने लाभ दिला जाणार आहे .सोयगाव तालुक्यात सदर प्रकल्प अंतर्गत एकूण 22 गावांची निवड झाली असून शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन संरक्षित शेती कृषी यांत्रिकीकरण गोदाम व्यवस्था सिंचन साधने शेततळे या सकट इतर घटकांचे जास्तीत जास्त अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी मंडळ अधिकारी आर जी गुंडिले यांनी केले आहे .सदर योजनेचा प्रचार प्रसिद्धी होण्यासाठी दिनांक आठ जानेवारीपासून तालुक्यात जनजागृती शेतकरी मेळावा याचे सदर बावीस गावात आयोजन केले जात असून सदर मेळाव्यात शेतकऱ्यांना योजनेची माहिती दिली जात आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक 8 जानेवारी रोजी जरंडी येथे सदर जनजागृती मिळाव्याच्या शुभारंभ करण्यात आला.आज दिनांक 08/01/2026 रोजी नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प अंतर्गत ग्राम पंचायत जरंडी येथे शेतकरी जनजागृती मेळावा घेण्यात आला. त्या प्रसंगी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सोयगाव तर्फे तालुका कृषी अधिकारी भारत कासार,आर. जी. गुंडिले (मंडळ कृषि अधिकारी), डी. आर. मुठाळ ( कृषि सेवक) आणि सिकंदर रशिद तडवी ( समूह सहाय्यक, नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प) यांनी शेतकऱ्यांना प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विविध वैयक्तिक लाभाचे घटक योजना तसेच गटांसाठी असलेल्या योजनांचे लाभार्थी पात्रतेचे निकष, अर्ज कुठे अन् कसा करावा, ग्राम कृषी विकास समितीचे कार्य, देय असलेले अनुदान याबाबत सविस्तर मार्गदर्शन मंडळ अधिकारी आर जी गुंडिले यांच्या कडून करण्यात आले.

याप्रसंगी ग्राम कृषी विकास समिती जरंडीचे अध्यक्ष तथा सरपंच, उपसरपंच, समिती सदस्य, शेतकरी आदी मोठ्या उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार