Home / Uncategorized / मिटमिटा येथे गुन्हे शाखेची धडक कारवाई; ५.६३ कोटींची बेहिशेबी रोकड, सोने-चांदी व शस्त्रसाठा जप्त….

मिटमिटा येथे गुन्हे शाखेची धडक कारवाई; ५.६३ कोटींची बेहिशेबी रोकड, सोने-चांदी व शस्त्रसाठा जप्त….

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

६,३५० जिवंत काडतुसे, पिस्तुले, रायफल, तलवारीसह मोठा शस्त्रसाठा हस्तगत; छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आयकर विभागालाही माहिती

छत्रपती संभाजीनगर शहरातील मिटमिटा परिसरात गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री उशिरा टाकलेल्या धाडीत तब्बल ५ कोटी ६३ लाख ३७ हजार ९९४ रुपयांचा बेहिशेबी मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने, अग्निशस्त्रे, धारदार शस्त्रे तसेच हजारो जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डॉ. विवेक जाधव करीत आहेत.

गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत मिटमिटा परिसरातील एका घरात बेहिशेबी रोख रक्कम व अग्निशस्त्रांचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना देण्यात आल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला. झडतीदरम्यान शिला साळवे या महिला घरात उपस्थित होत्या. तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने, शस्त्रे व काडतुसे आढळून आली. त्यानंतर संपूर्ण मुद्देमाल पंचनाम्याद्वारे जप्त करण्यात आला.

जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये ५ कोटी २६ लाख २९ हजार ५६० रुपयांची रोख रक्कम, २ पिस्तुले, ४ रायफल, २१ धारदार शस्त्रे, ६,३५० जिवंत काडतुसे, १५१.३३ ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत २१.३४ लाख रुपये), ३.९ किलो चांदीचे दागिने (किंमत ८.०९ लाख रुपये) तसेच विविध कंपनींच्या मद्याच्या बाटल्यांचा समावेश आहे. जप्त शस्त्रांपैकी चार शस्त्रांचे परवाने मयत व्यक्तीच्या नावावर असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या बेहिशेबी मालमत्तेबाबत आयकर विभागालाही माहिती देण्यात आली असून आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जाणार आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) शशिकांत सातव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मजहर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा व आर्थिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार