अध्यक्ष – ॲड वाहिद शेख
वाशीम जिल्हा प्रतिनिधी सुधीर ढगे (कारंजा लाड) : कारंजा लाड बार असोसिएशनच्या सन २०२६ साठी झालेल्या निवडणुकीत ॲड. वाहीद शेख यांच्या नेतृत्वाखालील सन्मान पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या निवडणुकीत वकिल बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. निलेश बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ०८/०१/२०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदी ॲड. वाहीद शेख, उपाध्यक्षपदी ॲड. वैभव ढगे, सचिवपदी ॲड. स्वप्नील नायसे , सहसचिवपदी ॲड. दानिश मरछिया तर कोषाध्यक्षपदी ॲड. सतीश कानतोडे, ग्रंथपालपदी ॲड. आवेश शेख यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून ॲड. मुकेश बाबरे व ॲड. माधुरी (कडू) राऊत यांची निवड झाली आहे.

उपाध्यक्ष – अँड वैभव ढगे
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे वकिल संघटनेच्या सदस्यांकडून अभिनंदन करण्यात आले. नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. वाहीद शेख यांनी बोलताना सांगितले की, “वकिलांच्या हितासाठी, न्यायालयीन सुविधांमध्ये सुधारणा व बार असोसिएशनचा सर्वांगीण विकास हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट राहील.”
या निवडणुकीमुळे कारंजा बार असोसिएशनमध्ये नव्या नेतृत्वाकडून सकारात्मक व कार्यक्षम कामाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.





