Home / महाराष्ट्र / मटका-गुटखा-मोबाईल चोरीने लोक त्रस्त; पोलिसांच्या निष्क्रीयतेवर जनतेचा आक्रोश..

मटका-गुटखा-मोबाईल चोरीने लोक त्रस्त; पोलिसांच्या निष्क्रीयतेवर जनतेचा आक्रोश..

 

शिऊर पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंद्यांचा सुळसुळाट!

 

छत्रपती संभाजीनगर :प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

 

वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ६३ गावांच्या परिसरात सध्या अवैध धंद्यांचे साम्राज्य फोफावले आहे. लोणी खुर्द, शिऊर, मनूर, गारज, लाखनी मांडकी ,आणि परिसरातील गावांमध्ये , मटका, गुटखा, वाळू यांसारखे अवैध व्यवहार खुलेआम सुरू असून, पोलिस मात्र शांत बसले आहेत.त्यामुळे पोलिसांनीच अवैध धंद्यांना पाठबळ दिल्याची चर्चा सध्या परीसरात रंगांना दिसत आहे.

 

अवैध धंदे सुरूच… ठाणे प्रमुख मौनात!

 

गेल्या एक वर्षांपासून आलेले ठाणेप्रमुख आल्यापासून लोणी खुर्द परिसरात मटका अड्डे पुन्हा जोमात सुरू झाले आहेत.

धाब्यांवर खाकी वर्दीची वर्दळ असतानाही दारूची खुलेआम विक्री सुरू आहे.

“देवानघेवा”च्या साखळीमुळे हे अड्डे पोलिस संरक्षणाखाली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

 

चोरीचा सुळसुळाट बाजारात भीतीचे वातावरण!

 

लोणी खुर्द व शेजारील गावांमध्ये मोबाईल, मोटरसायकल चोरी, घरफोड्या यांचा अक्षरशः पाऊस पडत आहे.

प्रत्येक साप्ताहिक बाजारानंतर एकतरी चोरीची घटना घडते.

“पोलीस स्टेशन फक्त नावालंच आहे, कारवाई मात्र शून्य!” असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.

 

 

हप्तेखोरीत अडकलेले पोलिस ?

 

सूत्रांच्या माहितीनुसार, काही पोलीस कर्मचारी अवैध धंद्यांकडून नियमित हप्ता घेतात, त्यामुळे हे व्यवहार अधिक निर्भयपणे सुरू राहतात.

एकाच तालुक्यात काही कर्मचाऱ्यांच्या तीन ठिकाणी बदली झाल्याची बाबही चर्चेत आहे.

“प्रामाणिक अधिकारी गप्प, नशेखोर पोलिस मोकळे!” अशी परिस्थिती लोकांमध्ये संताप निर्माण करते आहे.

या गैरवर्तनामुळे जनतेचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास पूर्णपणे ढळला आहे.

जनतेचा सवाल : “अवैध धंदे थांबवणार कोण?”

जिल्हा पोलीस प्रशासनाने तातडीने स्वतंत्र चौकशी पथक नेमून या परिसरातील अवैध धंद्यांवर धडक कारवाई करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा शिऊर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहील आणि जनतेचा विश्वास संपेल…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार