Home / सोयगाव / सावळदबारा येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी..

सावळदबारा येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी..

 

जिजाऊ–विवेकानंद जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी प्राचार्य कोलते पाटील यांचे मार्गदर्शन

 

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

 

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील जय कालंका देवी शिक्षण प्रसारक संस्था संचलित छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावळद बारा तसेच कै. लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता माँ जिजाऊ आईसाहेब व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थाध्यक्ष भाऊराव लक्ष्मणराव कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला, तर स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी झाला. माँ जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत. त्यांनी शिवरायांना स्वराज्याची संकल्पना देऊन त्याच्या प्रत्यक्ष उभारणीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन केले. त्यामुळे त्यांना स्वराज्याची जननी व रयतेची माता म्हणून गौरविले जाते. त्यांच्या दूरदृष्टी, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेमुळे हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत त्यांचे मोलाचे योगदान लाभले.

युवकांचे प्रेरणास्थान असलेले स्वामी विवेकानंद हे महान भारतीय तत्त्वज्ञ, संन्यासी व रामकृष्ण परमहंसांचे शिष्य होते. त्यांनी वेदांत व योगाचे तत्त्वज्ञान पाश्चात्त्य जगात पोहोचवले. १८९३ साली शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत दिलेल्या ऐतिहासिक भाषणामुळे भारतीय संस्कृतीला जागतिक ओळख मिळाली. त्यांनी रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशनची स्थापना करून तरुणांना राष्ट्रउभारणी व समाजसेवेसाठी प्रेरित केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यालयाचे प्राचार्य श्री. नारायण कोलते सर यांच्या हस्ते माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्यांनी दोन्ही महान विभूतींच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्ती, चारित्र्य, आत्मविश्वास व समाजहिताची शिकवण दिली.

या प्रसंगी शिक्षक भास्कर ससाने, विकास पाटील, विजयसिंह राजपूत, विनोद जाधव, अमोल कोलते पाटील,मुकुंदा व्यवहारे, भास्कर खमाठ, ज्ञानेश्वर राठोड, भूषण देसले, पोपटराव सोनवणे, गणेश मोहने, विकास बोके, सतीश गवांडे, विनायक अमृतकर, जयराम गोती, योगेश राठोड, हिरालाल सोनवणे, सतीश कवडे, दिलीप कोळी, गणेश सत्रे, प्रदीप पाटील, सुनील चव्हाण, मोहन बोरे तसेच कर्मचारी अजबराव चव्हाण, श्याम जाधव, बाबासाहेब कोलते, संदीप कोलते यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बंधू व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, संस्कार व प्रेरणा निर्माण झाली, अशी माहिती जीवन कोलते यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार