Home / Uncategorized / सावळदबारा येथे ग्रामपंचायत कार्यालयात चक्रधर स्वामींची ८०५ वी जयंती उत्साहात…

सावळदबारा येथे ग्रामपंचायत कार्यालयात चक्रधर स्वामींची ८०५ वी जयंती उत्साहात…

 छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन; चक्रधर स्वामींच्या विचारांचा समाजाने अंगीकार करावा – प्राचार्य जीवन कोलते पाटील

सावळदबारा : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील ग्रामपंचायत कार्यालयात भगवान श्री चक्रधर स्वामी यांची ८०५ वी जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ, पदाधिकारी, पत्रकार तसेच पुजारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस प्राचार्य जीवन कोलते पाटील व भावी सरपंच गणेश खैरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भाजपाचे तालुका सरचिटणीस गुलाबराव कोलते पाटील तसेच पुजारी मंडळी व उपस्थित मान्यवरांनी चक्रधर स्वामींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी प्राचार्य जीवन कोलते पाटील यांनी भगवान श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट केले. चक्रधर स्वामी यांनी समाजातील अंधश्रद्धा, भेदभाव व विषमता दूर करण्यासाठी समतेचा आणि मानवतेचा संदेश दिला. सर्वसामान्य माणसाला अध्यात्माची दिशा देत त्यांनी सामाजिक सुधारणेला चालना दिली. त्यांच्या विचारांचा आजच्या पिढीने अभ्यास करून तो आचरणात आणणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

चक्रधर स्वामी जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थितांनी चक्रधर स्वामींच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या सामाजिक व अध्यात्मिक विचारांना अभिवादन केले.

याप्रसंगी सरपंच मो. आरिफ मो. लुखमान, भाजपाचे तालुका सरचिटणीस गुलाबराव कोलते पाटील, भावी सरपंच गणेश खैरे, उपसंपादक गोकुळसिंग राजपूत, पत्रकार जब्बार डी. तडवी, जब्बार एस. तडवी, पत्रकार रहिम पठाण, पुजारी मधुकर पुजारी, शुभम पुजारी, दिलीप पुजारी, राहुल (गोलू) पुजारी, सोनू सुधाकर पुजारी, रवी जैस्वाल, सुनील शिल्पकर, राजू दाडंगे, राहुल सोळंके, संजू कारगोळे, विठ्ठल आप्पा काळे, निखिल टिकारे, ग्रामपंचायत कर्मचारी अमोल रावळपिंडी, अनिल राजपूत, सुभाष मानकर, संजय नप्ते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार