🛑लोक महाराष्ट्र न्यूज 🛑
मानोरा प्रतिनिधी: सुधीर ढगे
ग्राम ईंजोरी तालुका मानोरा येथील रुग्णसेवक दानशूर दामू पाटील राऊत यांनी समाजाच देणं म्हणून मानोरा इंजोरी आणि वाशिम येथे रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका देण्याचे ठरविले. त्यापैकी बुधवार 24/ 12/ 2025 रोजी कारंजा मानोरा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार सई ताई डहाके यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख उपस्थिती श्री राजूभाऊ काळे जिल्हा भाजपा सरचिटणीस अरविंद इंगोले भाजपा तालुकाध्यक्ष श्री राजेंद्र देशमुख तालुका सरचिटणीस श्री प्रवीण धोटे तालुका सरचिटणीस, हिम्मत पाटील राऊत माजी सरपंच विजय लाला जयस्वाल तालुका उपाध्यक्ष आणि इंजोरी सर्कल आणि गावातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते. कार्यक्रमाला शेकडो गावकऱ्यांनी आणि महिलांनी उपस्थिती दर्शवली. आमदार सई ताई डहाके आणि उपस्थितांनी श्री दामू पाटील राऊत यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमा चे आयोजन श्री प्रशांत भादडे, अनंता राऊत , संतोष बनकर ज्ञानेश्वर आलाटे, गोपाल पायगन, अंकुश ठाकुलकर यांनी यशस्वी रित्या केला.




