Home / शिक्षण / उद्या पासून क्रीडा महोत्सवाला प्रारंभ

उद्या पासून क्रीडा महोत्सवाला प्रारंभ

  1. वाशिम जिल्हा प्रतिनिधी :सुधीर ढगे

कॉन्व्हेंट ऑफ स्कॉलर्स व जे एस पब्लिक स्कुल मध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून विध्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकास व्हावा या उदात्त हेतूने शाळेचे अध्यक्ष तथा प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेचे संचालक प्रा अनिल चव्हाण यांच्या संकल्पनेतून उद्या पासून सतत चार दिवस होणाऱ्या क्रीडा महोत्सवाचे उदघाटन मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या क्रीडा महोत्सवाचे उदघाटन आदर्श तलाठी तथा श्री सेवालाल बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व नागराज क्रीडा व शिक्षण बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य सुनिल हनुमंते आणी प्रा अनिल चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. त्या प्रसंगी विविध खेळाचे आयोजन करण्यात आले असून या मध्ये रँनिंग रेस बकेट बॉल लांब उडी निंबू चमचा संगीत खुर्ची बुक बॅलन्स व सांघिक खेळात कब्बडी लंगडी क्रिकेट इत्यादी खेळाचे आयोजन केले आहेत. या खेळासाठी विध्यार्थ्यांच्या मनात एक प्रकारे आनंद निर्माण झाले असून आनंद मेळावा च्या निमित्याने कार्यक्रमाची सांगता होईल असे हीं आयोजकाच्या वतीने आवाहन करण्यात आले. तरी या सुवर्ण संधीच लाभ घ्यावे आणी या कार्यक्रमाला सर्व विध्यार्थी पालक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला कु रक्षा राऊत शिवणी उमरे सीमा चव्हाण रुपाली मांजरे राजेश राठोड मयुरी राठोड आचल भोयर व अश्विनी पिंपळकर इत्यादी परिश्रम घेनार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार