Home / समाज / दलित वस्तीतील विश्वशांती बुद्ध विहार पाण्याविना..!

दलित वस्तीतील विश्वशांती बुद्ध विहार पाण्याविना..!

दोन वर्षांपासून टाकीत पाण्याचा थेंबही नाही –समाजबांधवांचा आरोप ..!

 

विलास गवारगुर (प्रतिनिधि) : ग्राम चिंचपूर, ता. खामगाव येथील दलित वस्तीमध्ये असलेल्या विश्वशांती बुद्ध विहारासाठी ग्रामपंचायतीकडून दलित वस्ती निधीतून पाण्याची टाकी उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र ही टाकी उभारून दोन वर्षांचा कालावधी लोटला तरी आजपर्यंत टाकीत पाण्याचा एक थेंब सुद्धा सोडण्यात आलेला नाही, अशी गंभीर तक्रार बौद्ध समाज बांधवांकडून करण्यात येत आहे.

या संदर्भात सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. “पाणी आले की देऊ” असे सांगून वेळकाढूपणा केला जात असून, प्रत्यक्षात टाक्या केवळ शोभेच्या वस्तू बनून उभ्या आहेत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

विश्वशांती बुद्ध विहारात धार्मिक कार्यक्रम, जयंती, सामूहिक प्रार्थना व सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात. मात्र पाण्याची कोणतीही सुविधा नसल्यामुळे या कार्यक्रमांच्या वेळी पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतेसाठीही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

 

 

दलित वस्ती निधीतून दिलेल्या सुविधांचा उपयोग होत नसेल, तर तो निधी देण्यामागील उद्देशच प्रश्नांकित होत असल्याची भावना समाजात आहे. ग्रामपंचायतीने तातडीने पाण्याचे नियोजन करून बुद्ध विहाराच्या टाकीत पाणी सोडावे, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही समाज बांधवांनी दिला आहे.

तरी संबंधित प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी समस्त बौद्ध बांधवांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार