_छत्रपती शिवाजी महाराजांवरील आक्षेपार्ह पुस्तकावर बंदीची मागणी; प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी_
📍 बुलढाणा | प्रतिनिधी
प्रशांत अंबि यांनी प्रकाशित केलेल्या “शिवाजी कोण होता” या पुस्तकामध्ये हिंदू समाजाचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह व वादग्रस्त मजकूर असल्याच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, विविध स्तरांवर निषेध व्यक्त केला जात आहे।

या प्रकरणाची गंभीर दखल घेत सनातन हिंदू धर्म जागरण यात्रा, महाराष्ट्रच्या वतीने जिल्हाधिकारी महोदयांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। यावेळी यात्रेचे मुख्य संयोजक संत विवेक दास जी शास्त्री महाराज (काशी, वाराणसी) यांच्या द्वारा
निवेदन नमूद करण्यात आले आहे की, संबंधित पुस्तकातील मजकूरामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना तीव्रपणे दुखावल्या जात असून, यामुळे जिल्ह्यात तसेच राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पुस्तकाची सखोल चौकशी करावी। तसेच, जर मजकूर आक्षेपार्ह आढळला तर त्या पुस्तकावर त्वरित बंदी घालून संबंधित लेखक व प्रकाशकाविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे।
यावेळी बोलताना संत विवेक दास जी शास्त्री महाराज म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण राष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत। त्यांच्या कार्यातून धर्म, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीचा संदेश मिळतो। अशा महान व्यक्तिमत्त्वाविषयी कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह लिखाण सहन केले जाणार नाही। शासनाने या प्रकरणी तातडीने आणि कठोर भूमिका घेणे अत्यावश्यक आहे।”
तसेच, त्यांनी पुढे सांगितले की, सनातन हिंदू धर्म जागरण यात्रा ही समाजात धर्म, संस्कृती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी चळवळ असून, अशा घटनांविरोधात समाजाला जागृत करणे हे आपले कर्तव्य आहे।
दरम्यान, संबंधित निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून, प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित योग्य ती कारवाई करावी, अन्यथा भविष्यात तीव्र लोकआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला।






