Home / छत्रपती संभाजी नगर / समाजकार्याचा झंझावात : देशमुख व राजपूत यांचा राष्ट्रीय जीवनगौरव समाजभूषण पुरस्काराने गौरव…..

समाजकार्याचा झंझावात : देशमुख व राजपूत यांचा राष्ट्रीय जीवनगौरव समाजभूषण पुरस्काराने गौरव…..

शिर्डीच्या पावन भूमीत सावळदबाराचे दिलीप देशमुख व गोकुळसिंग राजपूत यांना सन्मानित ; 

सोयगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

सामाजिक व पत्रकारितेतील योगदानाची दखल : राजपूत व देशमुखना राष्ट्रीय पातळीवर गौरव 

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील उपसंपादक गोकुळसिंग राजपूत व पत्रकार दिलीप देशमुख यांना सामाजिक, पत्रकारिता व जनहिताच्या कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राष्ट्रीय पातळीवरील ‘जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा भव्य पुरस्कार सोहळा शनिवार, दि. १० जानेवारी २०२६ रोजी साईबाबांच्या पावन भूमीत शिर्डी येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार सोहळा–२०२६ मध्ये हा सन्मान प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्री. सुदाम संसारे यांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने देशमुख व राजपूत यांचा गौरव करण्यात आला.

महाराष्ट्रासह देशपातळीवर सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविणे, अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठविणे, सामाजिक प्रश्नांवर परखड भूमिका मांडणे व लोकशाही मूल्ये जपण्यासाठी केलेल्या योगदानाची दखल घेत हा राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आला.

पसंपादक गोकुळसिंग राजपूत यांनी शिक्षण, साहित्य व समाजकार्याच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य केले असून जेष्ठ पत्रकार म्हणूनही त्यांची वेगळी ओळख आहे. तर पत्रकार दिलीप देशमुख यांनी निर्भीड व प्रामाणिक पत्रकारितेद्वारे सामान्य जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडत विश्वासार्ह नेतृत्व निर्माण केले आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक प्रश्नांना न्याय मिळाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते.

या सोहळ्यास चित्रपटसृष्टीतील मान्यवर अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या राष्ट्रीय सन्मानामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व सोयगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून ही बाब परिसरासाठी अभिमानास्पद ठरली आहे.

या यशाबद्दल इंजिनियर नितीन राठोड, इंजिनियर सुरेश चौधरी,गणेश राजपूत, शाहीर दादासाहेब, ह.भ.प. प्रदीप जगताप पाटील, प्रवीण ठाकरे, उपशिक्षक शंकर भामेरे, पत्रकार ईश्वर हिवाळे,भारत नप्ते,मुरलीधर दाभाडे,तसेच विविध पत्रकार संघटना, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी उपसंपादक गोकुळसिंग राजपूत व पत्रकार दिलीप देशमुख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला असून पुढील सामाजिक व पत्रकारितेच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार