चिखली : (प्रतिनिधी)
चिखली तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून सर्दी, खोकला आणि कफ यांसारख्या विषाणूजन्य आजारांनी जोर धरला आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत असतानाच, चिखली सामान्य रुग्णालयात औषधांचा भीषण तुटवडा निर्माण झाल्याचे समोर आले आहे.
रुग्णालयात गेल्या दोन महिन्यांपासून कफ सिरप उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी दुकानदारांकडून महागात औषधे विकत घ्यावी लागत आहेत. अनेकांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की, “डॉक्टर तपासणी करतात, पण औषधं नाहीत,सामान्य नागरिकांना बाहेरून घ्यावी लागत आहे .”

केवळ कफ सिरपच नव्हे, तर सर्दी-खोकल्याच्या इतर आवश्यक औषधांचाही तुटवडा आहे. गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आपत्कालीन रुग्णांना सर्वाधिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे.

आमच्या पत्रकारांनी विचारणा केली असता रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, 3 डिसेंबर 2025 रोजी बुलढाणा सिव्हिल सर्जन कार्यालयाकडे औषधांचा पुरवठा मागवण्यात आला आहे, मात्र अद्याप कोणताही साठा प्राप्त झालेला नाही.
दरम्यान, आरोग्य विभागाने “नव्या औषधांचा पुरवठा प्रक्रिया सुरू असून लवकरच कमतरता दूर होईल” असे आश्वासन दिले असले तरी नागरिक याबाबत साशंक आहेत.
औषध तुटवड्यामुळे निर्माण झालेली ही परिस्थिती ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील गंभीर उणिवा उघड करत असून, रुग्ण मात्र सर्व गोंधळात अडकले आहेत