Home / संस्कृती / मावळ्यांच्या पुतळ्यांबाबत शिवसेनेची निवेदनाद्वारे मागणी; भूषण गावंडे सरांसोबत सकारात्मक व समाधानकारक चर्चा..!

मावळ्यांच्या पुतळ्यांबाबत शिवसेनेची निवेदनाद्वारे मागणी; भूषण गावंडे सरांसोबत सकारात्मक व समाधानकारक चर्चा..!

चिखली (बुलडाणा) – चिखली पोलिस स्टेशन प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या पुतळ्यांबाबत शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यासाठी भेट घेण्यात आली असता, पोलिस प्रशासनाकडून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पोलिस अधिकारी भूषण गावंडे सर यांनी निवेदन स्वीकारून संबंधित विषयावर सविस्तर आणि समाधानकारक चर्चा केली.

दै. देशोन्नती वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांमधील पुतळ्यांचे दाखविलेले स्थान हे तात्पुरते स्वरूपातील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या पुतळे ज्या ठिकाणी ठेवले आहेत ते मुख्य प्रवेशद्वारावर नसून,
स्टेशनमध्ये येणाऱ्या कर्मचारी, अधिकारी व नागरिकांना प्रकर्षाने दृष्टीस पडावे आणि शिवरायांच्या मावळ्यांच्या शौर्यापासून प्रेरणा मिळावी याच उद्देशाने त्या जागी ठेवण्यात आले आहेत.
भूषण गावंडे सरांनी शिवसेनेच्या प्रतिनिधींना विश्वास दिला की,

मावळ्यांचा सन्मान सर्वोच्च ठेवूनच सर्व निर्णय घेतले जातील आणि
स्थानिकांच्या भावना जपल्या जातील असे शेतकरी नेते प्रशांत ढोरे पाटील यांच्याशी चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांनी व्हिडिओ कॉल द्वारे सद्यस्थिती असलेल्या पुतळ्याची केलेली मांडणी दाखवून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी प्रत्यक्ष चर्चेत सहभागी झालेले.

शिवसेना शहरप्रमुख विलास घोलप, शिवसेना उप तालुका प्रमुख
कृष्णा जाधव, शिवसेना नेते अनमोल ढोरे पाटील आणि इतर शिवसैनिकांनी प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत केले.

त्यांनी म्हटले की “मावळ्यांचा सन्मान हा सर्वांसाठी समान आहे. प्रशासनाकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद समाधान देणारा आहे. भविष्यात कोणताही गैरसमज न ठेवता, या विषयावर समन्वयाने निर्णय व्हावा हीच अपेक्षा.”
या घटनेमुळे वातावरणातील तणाव कमी होऊन रचनात्मक संवादाचा मार्ग मोकळा झाल्याचे शिवसेना नेते अनमोल ढोरे पाटील यांनी समाधानाने नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार