देऊळगाव राजा (प्रतिनिधी): मुन्ना ठाकूर
स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालय, ………., महाविद्यालय, स्वर्गवासी भास्करराव शिंगणे महाविद्यालय साखरखेडा आणि सिंधुताई जाधव महाविद्यालय, मेहकर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक पाणथळ दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या संयोजनात श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या एन.सी.सी. व प्राणीशास्त्र विभागाने पुढाकार घेतला.
दिनांक २ फेब्रुवारी हा दरवर्षी जागतिक वेटलँड डे म्हणून साजरा केला जातो. यावर्षी ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. व्ही. गोरे हे होते.
या कार्यक्रमात प्रा. डॉ. जी. आर. परिहार (प्राणीशास्त्र विभाग प्रमुख, जे.एन.व्ही. विद्यापीठ, जोधपूर, राजस्थान) यांनी पाणथळ भूमी संवर्धन व जैवविविधतेच्या सद्यस्थितीवर सविस्तर आणि अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. दुसरे व्याख्याते कर्नल ओमेश शुक्ला (कमांडिंग ऑफिसर, १३ महाराष्ट्र बटालियन, एन.सी.सी., खामगाव) यांनी एन.सी.सी. व पर्यावरण संरक्षण या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. अतिथींचा परिचय परिचय डॉ. आर. आर. खवल आणि डॉ. ओंकार तनपुरे यांनी करून दिला. तसेच यावर्षीच्या Current Theme वर Lt. डॉ. एम. आर. तांदळे यांनी आपले प्रभावी विचार
मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट अर्जुन वाघमारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डी. एम. शिंबरे यांनी केले.
या निमित्ताने आयोजित पोस्टर सादरीकरण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पाणथळ भूमी संरक्षण, पर्यावरण संतुलन व जैवविविधता या विषयांवर पोस्टर्स सादर करून जनजागृती केली. प्रा. डी. एम. शिंबरे, डॉ. अरविंद कानवटे व डॉ. अमोल जाधव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेत प्रथम क्रमांक कॅडेट अजय सांगळे, द्वितीय क्रमांक विनय बोंडे व तृतीय क्रमांक कॅडेट अर्जुन वाघमारे यांनी पटकावला.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त व महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव तसेच व्यवस्थापन प्रतिनिधी सौ. छाया राजे विजयसिंह जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






