Home / Uncategorized / शिवाजीनगरात कोयता दाखवत दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारास डायल-112 बिट मार्शलने आवळल्या मुसक्या

शिवाजीनगरात कोयता दाखवत दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारास डायल-112 बिट मार्शलने आवळल्या मुसक्या

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत (ब्युरो चीफ)

 

 

धारदार कोयता, चाकू व विना नंबर मोपेडसह आरोपी जेरबंद; 8 पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद

छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर परिसरात धारदार लोखंडी कोयता हातात घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारास जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या डायल-112 बिट मार्शल पथकाने थरारक पाठलागानंतर ताब्यात घेतले. आरोपीकडून धारदार कोयता, चाकू व विना नंबरची मोपेड स्कूटी असा सुमारे 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि. 10 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 2 वाजता जंबुरे हॉस्पिटल परिसरात एक इसम कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती बातमीदारामार्फत बिट मार्शलचे पोअं. मारोती गोरे यांना मिळाली. ही बाब तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांना कळवण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ पथक रवाना करण्यात आले. जंबुरे हॉस्पिटलच्या बाजूला संशयित इसम कोयता व मोपेडसह आढळून आला. पोलिसांना पाहताच तो पळू लागला; मात्र काही अंतरावरच त्याला पकडण्यात आले. चौकशीत त्याने आपले नाव रितेश उर्फ लड्या नितीन दोडवे (वय 20, रा. गारखेडा परिसर) असे सांगितले. मोपेडबाबत समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात भा. हत्यार कायदा कलम 4/25 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा. फौजदार नलावडे करीत आहेत.

तपासादरम्यान समोर आलेल्या गुन्हे अभिलेखानुसार आरोपीवर यापूर्वी जवाहरनगर, उस्मानपुरा व सातारा पोलीस ठाण्यात चोरी, घरफोडी, लुटमारी व धारदार शस्त्र बाळगणे असे 8 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपआयुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक आयुक्त पगारे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोह. बनकर, पोना. पठाण, पोह. उईके, पोअं. मारोती गोरे, शेलार आदींच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार