Home / महाराष्ट्र / बुलढाणा / सावरगाव डुकरे येथे भीषण कौटुंबिक हत्याकांड — मुलाने आई-वडिलांची हत्या करून घेतला स्वतःचा जीव!

सावरगाव डुकरे येथे भीषण कौटुंबिक हत्याकांड — मुलाने आई-वडिलांची हत्या करून घेतला स्वतःचा जीव!

चिखली (लोक महाराष्ट्र न्यूज) 

 चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथे पाच नोव्हेंबरच्या रात्री घडलेल्या भीषण घटनेने परिसर हादरला आहे. एका मुलाने स्वतःच्या आई-वडिलांची निर्घृणपणे हत्या करून त्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

 

मृतांमध्ये सुभाष डीगंबर डुकरे (वय 75), त्यांची पत्नी लता सुभाष डुकरे (वय 65) आणि मुलगा विशाल सुभाष डुकरे (वय 42) यांचा समावेश आहे. हे तिघेही सावरगाव डुकरे येथील रहिवासी होते.

 

घटनेनंतर गावात प्रचंड भीतीचे व शोककळेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वाद किंवा मानसिक नैराश्यामुळे ही घटना घडली असावी, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. तथापि, नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस ठाण्याचे अधिकारी, फॉरेन्सिक पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घराला सील करण्यात आले असून पंचनामा सुरू आहे. मृतदेह जिल्हा रुग्णालय, चिखली येथे पोस्टमॉर्टेमसाठी पाठविण्यात आले आहेत.

 

या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील आणि ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार