छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
मार्च एंडिंगच्या पार्श्वभूमीवर ३५ जणांचे पथक मैदानात; ‘दामिनी’ महिला पथकाचा सक्रिय सहभाग
सोयगाव तालुक्यात व फर्दापूर परिसरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून (महावितरण) थकीत वीज बिल वसुलीसाठी जोरदार मोहीम राबवण्यात येत असून, मार्च एंडिंगच्या पार्श्वभूमीवर या मोहिमेला विशेष वेग देण्यात आला आहे. थकीत बिल न भरलेल्या ग्राहकांवर थेट वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सिल्लोड विभागांतर्गत फर्दापूर शाखेमार्फत सुरू असलेल्या या मोहिमेचे नेतृत्व कार्यकारी अभियंता अविनाश राऊत व उपकार्यकारी अभियंता प्रदीप काळे करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली थकीत ग्राहकांचा शोध घेऊन वसुली प्रक्रिया गतीमान करण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत वीज बिल न भरलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा तत्काळ खंडित करण्याचे धोरण अवलंबण्यात आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी थकीत ग्राहकांमध्ये हालचाल सुरू झाली असून, बिल भरण्यासाठी नागरिक पुढाकार घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विशेष बाब म्हणजे, या मोहिमेत ‘दामिनी’ नावाचे महिला पथक स्थापन करण्यात आले असून, महिलांचा सक्रिय सहभाग लक्षवेधी ठरत आहे. वीज वसुलीच्या कामात महिला कर्मचारीही तितक्याच ताकदीने मैदानात उतरल्याने मोहिमेला अधिक प्रभावीपणा प्राप्त झाला आहे.
सिल्लोड विभाग व उपविभाग मिळून सुमारे ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक प्रत्यक्ष गावागावांत जाऊन थकीत वीज बिल वसुली करत आहे. या पथकात
सहाय्यक अभियंता घुले साहेब, सहाय्यक अभियंता ओटे साहेब, सहाय्यक अभियंता दिपक चौधरी,निम्नस्तर लिपिक सचिन आगलावे, विनोद राऊत, विशाल सोनवणे, किशोर साळवे, लक्ष्मण पवार,भेंडे साहेब, हिवाळे साहेब, तळेकर साहेब, विष्णू लाड, स्वप्नील लव्हाळे, समाधान सपकाळ, गणेश चौधरी, सिताराम नवगिरे, किरण बनकर, धनराज मोकासुरे, सय्यद इम्रान सय्यद अली, सुनील साळवे,सागर तेली,मंगेश धनोकर, ज्ञानेश्वर घोडके, विजय बावणे, संदेश जाधव,मयूर तारापूरे यांसह अनेक कर्मचाऱ्यांचा समावेश असून, सर्वजण सक्रियपणे मोहिमेत सहभागी झाले आहेत.
दरम्यान, “नागरिकांनी थकीत वीज बिल तात्काळ भरून सहकार्य करावे, अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळता येणार नाही,” असा इशारा कार्यकारी अभियंता अविनाश राऊत यांनी दिला आहे.
या कठोर कारवाईमुळे वीज वसुलीत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून, महावितरणची ही मोहीम पुढील काही दिवस अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.






