चिखली (प्रतिनिधी): चिखली नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधून मंदाताई गणेश रिंढे यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. समाजकारण आणि विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घेत आलेल्या मंदाताई रिंढे या स्थानिक पातळीवर ओळखल्या जाणाऱ्या कार्यकर्त्या आहेत.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी, शिक्षणवृद्धीसाठी तसेच स्वच्छता आणि आरोग्यविषयक उपक्रमांसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, आणि प्रकाशयोजना यासारख्या मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी त्यांनी ठोस योजना तयार केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
“जनतेच्या विश्वासावर आणि सहकार्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रभाग क्रमांक १० चा सर्वांगीण विकास हा माझा मुख्य ध्येय आहे,” असे मंदाताई रिंढे यांनी यावेळी सांगितले.
स्थानिक नागरिकांनीही त्यांच्या कामाची दखल घेत, त्या पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. नागरिकांशी थेट संपर्क आणि पारदर्शक कामकाजामुळे मंदाताई रिंढे यांना व्यापक पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे.






