Home / महाराष्ट्र / बुलढाणा / चिखली तहसीलच्या नाकावर अवैध रेती वाहतुकीचा धुमाकूळ!जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जप्त करण्यात आलेला रेती साठा घरकुल लाभार्थ्यांना वाटप.

चिखली तहसीलच्या नाकावर अवैध रेती वाहतुकीचा धुमाकूळ!जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जप्त करण्यात आलेला रेती साठा घरकुल लाभार्थ्यांना वाटप.

 

 

चिखली :-(लोक महाराष्ट्र न्यूज )बुलढाणा जिल्ह्यातील महसुल विभागात अग्रक्रमाने ओळखले जाणारे चिखली तहसिल सध्या अनेक महसुल घोटाळ्याने संपूर्ण जिल्हा भर चर्चेत असुन सध्या चिखली तहसिल अंतर्गत येणाऱ्या इसरुळ मार्गे अवैध रेती माफियांनी धुमाकूळ घातला असुन चिखली तहसिलचे तहसीलदार संतोष काकडे हे अवैध रेती वाहतूकीला लगाम लावण्यात पुन्हा अपयशी ठरले आहेत.

अवैध रेती माफियांनी परिसरात धुमाकूळ घातला असुन भरधाव वाहतुकीने सर्व सामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे.याचाच प्रत्यय दि.३ नाव्हेंबर २०२५ रोजी सकाळी आठ वाजेदरम्यान परिसरातील नागरिकांनी अनुभवला अवैध रेती वाहतूक करणारे भरधाव टिप्परचे टायर फुटल्याने चक्क टिप्पर चालकाने अवैध रेती चिखली देऊळगाव राजा महामार्गावरील मेरा खुर्द फाट्याजवळ हायड्रॉलिक करुन पळ काढला.याच महामार्गावरून जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील महोदय जात असल्याने त्यांनी याबाबत चिखलीचे उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांना तात्काळ रेतीचा पंचनामा करण्याचे सांगितले.त्यांनी लगेच चिखली चे नायब तहसीलदार विर यांना घटनास्थळी पाठवुन सदर रेतीचा पंचनामा करुन जप्त करण्यात आलेली चार ब्रास रेती ही मेरा खुर्द येथील प्रल्हाद चिंधाजी गव‌ई आणि नंदु रामचंद्र डोंगरे या घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आली.

 

महसुलाचे पथक गायब?

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही महिन्यांपूर्वी बुलढाणा जिल्ह्याचा दौरा केला होता.त्यावेळी खडकपुर्णा नदीतुन अवैध रेती उत्खनन व वाहतूकीमुळे परिसरातील सर्व सामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले असताना महसुल विभागाचे अधिकारी असो किंवा कर्मचारी असो हे अवैध रेती उत्खनन व वाहतूकीला पाठीशी घालत असल्याने महसुली मंञी यांनी बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांना अवैध रेती उत्खनन व वाहतूकीवर तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.अवैध रेती उत्खनन व वाहतूक मी कदापी खपवुन घेणार नाही असे ठणकावून सांगितले असल्याने डॉ किरण पाटील यांनी स्वताहा पुढाकार घेत इसरुळ,मंडपगाव येथुन होणारी अवैध रेती उत्खनन व वाहतूक होणार्या मार्गाची पाहणी करून तात्काळ चिखलीचे उपविभागीय अधिकारी शरद पाटील आणि तहसीलदार संतोष काकडे यांना उपाययोजना करण्याचे सांगितले होते.महसुल विभागाने तात्काळ चांगल्या उपाययोजनाही केल्या होत्या.काही ठिकाणी रस्ते खोदले होते तर काही ठिकाणी रस्त्यावर लोखंडी कमान लावण्यात आल्या होत्या.तसेच महसुलचे पथकेही दिवसरात्र तळ ठोकुन होते.माञ आता अवैध रेती माफियांनी डोके वर काढले असुन पर्यायी मिळेल त्या मार्गाने अवैध रेती वाहतूक सुरच असुन चिखली तहसिलचे महसुल पथक सध्या तरी कुठे गायब झाले आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे ? तहसीलदार संतोष काकडे यांनी याकडे लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे 

उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी तात्काळ ठोस उपाययोजना करण्याचे प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार