Home / Uncategorized / रवळा, जवळा व जामठीत राज्यमंत्री दर्जा प्राप्त इद्रिसजी मुलतानी यांचा भव्य सत्कार; जनतेच्या प्रेमाने भारावून व्यक्त केले कृतज्ञता..

रवळा, जवळा व जामठीत राज्यमंत्री दर्जा प्राप्त इद्रिसजी मुलतानी यांचा भव्य सत्कार; जनतेच्या प्रेमाने भारावून व्यक्त केले कृतज्ञता..

छत्रपती संभाजीनगर | सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

“आपले प्रेम, विश्वास आणि सहकार्य हीच माझी प्रेरणा; समाजहित व जनसेवेसाठी अधिक निष्ठेने कार्य करणार” – इद्रिसजी मुलतानी

सोयगाव तालुक्यातील रवळा, जवळा व जामठी या गावांमध्ये अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जा प्राप्त इद्रिसजी मुलतानी यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, गावकरी, माता-भगिनी तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी चेअरमन रामचंद्र दादा शिंदे, युवा नेते संभाजी पवार,सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांच्या हस्ते इद्रिसजी मुलतानी, सभापती उत्तम महारु चव्हाण व राहुल राठोड यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना पुढील सामाजिक व जनहिताच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सत्काराला उत्तर देताना इद्रिसजी मुलतानी म्हणाले, “रवळा, जवळा व जामठी येथील नागरिकांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास, सन्मान आणि प्रेम हीच माझी खरी ताकद व प्रेरणा आहे. समाजहित, अल्पसंख्याक समाजाचा विकास आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी अधिक निष्ठेने व प्रामाणिकपणे कार्य करत राहीन. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्य असेच कायम लाभत राहो, हीच माझी अपेक्षा आहे.”

कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, माता-भगिनी, युवक आणि ग्रामस्थांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. राज्यमंत्री दर्जाची जबाबदारी मिळाल्यानंतर ग्रामीण भागातील नागरिकांनी केलेल्या या भव्य स्वागतामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

याप्रसंगी विविध मान्यवरांनी इद्रिसजी मुलतानी यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

संभाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यमंत्री दर्जा प्राप्त झाल्यानंतर ग्रामीण भागातून इद्रिसजी मुलतानी यांना मोठा प्रतिसाद मिळत असून विविध ठिकाणी त्यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार