Home / महाराष्ट्र / समाजसेवक राकेश चोपडा यांचे अविरत सामाजिक कार्य – आता प्रभाग 8 मध्ये नगरसेवक पदासाठी चर्चेत !

समाजसेवक राकेश चोपडा यांचे अविरत सामाजिक कार्य – आता प्रभाग 8 मध्ये नगरसेवक पदासाठी चर्चेत !

 

चिखली:- (लोक महाराष्ट्र न्यूज)प्रशांत जैवाळ

चिखली शहरातील प्रसिद्ध समाजसेवक राकेश चोपडा हे लहान वयापासूनच सामाजिक कार्यात सक्रिय असून, व्यापारी वर्ग, नागरिक आणि समाजातील सर्व घटकांच्या न्यायहक्कासाठी सतत प्रयत्नशील आहेत.

अनेक वर्षांपासून ते डी. पी. रोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून व्यापारी वर्गाच्या न्यायहक्कासाठी व मालमत्ता धारकांच्या समस्यांसाठी ठामपणे लढा देत आहेत.

प्रभागातील असुविधांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी सलग ५ दिवस आमरण उपोषण केले तसेच नगरपरिषदेसमोर डफडे बजाव आंदोलन करून प्रशासनाची कुंभकर्णी झोप उडवली.

युवा नेतृत्व म्हणून त्यांनी अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या —

अखिल भारतीय पंजाबी खत्री समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून समाज एकतेसाठी कार्य.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे नेतृत्व.

धार्मिक आणि सेवाभावी कार्यातही ते अग्रेसर असून, गुरुद्वारा दशमेश दरबार साहिब, चिखली च्या माध्यमातून सर्वधर्म समभाव आणि अन्नदान सेवा यांचा प्रसार करतात. दर रविवारी आयोजित लंगर सेवेतून शेकडो नागरिकांना अन्नदान केले जाते.

तसेच, ओम काली ट्रस्ट च्या माध्यमातून हिंदुत्ववादी विचारांना बळ देणे आणि गोशाळा उपक्रमात सहभाग या माध्यमातून ते समाजात धर्म, सेवा आणि एकतेचा संदेश देतात.

 

💬 नागरिकांच्या मते — “राकेश चोपडा हे समाजातील प्रत्येक घटकासाठी तत्पर असलेले नेतृत्व आहे. अन्यायाविरुद्ध ठामपणे आवाज उठवणारा, जनतेच्या न्यायहक्कासाठी लढणारा एक खरा समाजसेवक.”

आणि म्हणूनच —

🌟 आता प्रभाग क्रमांक 8 मध्ये नगरसेवक पदासाठी राकेश चोपडा यांची जोरदार चर्चा सुरु आहे! 

 

त्यांच्या कार्याचा ठसा आणि सेवाभाव पाहता नागरिक मोठ्या अपेक्षेने त्यांच्याकडे पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार