छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
छत्रपती शिवाजी विद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयात प्रेरणादायी कार्यक्रम
“कष्ट प्रामाणिकपणा आणि मानवसेवा हाच खरा धर्म -हे संत सेवालाल महाराजांचे जीवनसूत्र आजच्या पिढीसाठी दीपस्तंभ आहे”-प्राचार्य पंजाबराव कोलते पाटील

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील जय कालिका देवी शिक्षण प्रसारक संस्था संचलित छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच कै. लक्ष्मणराव भिमराव पाटील वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची २८७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष भाऊराव लक्ष्मणराव कोलते पाटील तर प्रमुख उपस्थितीत सचिव रत्नाताई पंजाबराव कोलते पाटील होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
त्यानंतर प्राचार्य एन. आर. कोलते पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत संत सेवालाल महाराज यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, संत सेवालाल महाराज यांनी समाजात सत्य, संयम, कष्ट आणि मानवतेचा संदेश दिला असून युवकांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करून जीवनात प्रगती साधावी.यावेळी शिक्षकवृंद प्रा जीवन कोलते पाटील,भास्कर ससाने, विकास पाटील, विजयसिंह राजपूत, विनोद जाधव, मुकुंदा व्यवहारे, भास्कर खमाठ, ज्ञानेश्वर राठोड, भूषण देसले, पोपटराव सोनवणे, गणेश मोहने, विकास बोके, सतीश गवांडे, विनायक अमृतकर, जयराम गोती, योगेश राठोड, हिरालाल सोनवणे, सतीश कवडे, दिलीप कोळी, गणेश सत्रे, प्रदीप पाटील, सुनील चव्हाण, मोहन बोरे आदींसह कर्मचारी अजबराव चव्हाण, श्याम जाधव, बाबासाहेब कोलते, अमोल कोलते,संदीप कोलते तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बांधव आणि सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, नैतिक मूल्ये व संतपरंपरेचे महत्त्व अधोरेखित झाले. शेवटी जीवन कोलते यांनी उपस्थितांचे आभार मानले.






